शिरूर दिनांक ( प्रतिनीधी)
जैन धर्मीयांच्या आषाढी शुक्ल पौर्णिमा, २० जुलै पासून सुरु होणा-या चातुर्मासा साठी श्री सागरानंद समुदायवर्तिनी परम पूज्य साध्वी प्रियमरसाश्रीजी महाराज साहेब व परम पूज्य साध्वी श्रीयमरसाश्रीजी महाराज साहेब यांचे शिरूर शहरात भव्य मिरवणूक द्वारे प्रवेश सोहळाने स्वागत करत जैन धर्मियांच्या पवित्र चातुर्मासास सुरुवात झाली.
शिरूर येथील श्री वासुपूज्य स्वामी मंदीर, आनंद सोसायटी येथून मिरवणूक सुरु झाली व श्री गोडिजी पार्श्वनाथ मंदिर, कापडबाजार येथे सांगता झाली.यावेळी शिरुर-हवेली चे लोकप्रिय आमदार माननीय श्री अशोकबापू पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय राहुलदादा पाचर्णे, माजी नगरसेवक रविंद्र धनक, जाकिरखान पठाण, श्री अॅड. दिलीप करंजुले, दादाभाऊ वाखारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, मंगेश खांडरे शिरूर शहराचे वतीने गुरु महाराजांची स्वागत केले.
यावेळी संघपती भरत चोरडिया, गोडीजी पार्श्वनाथ टेंपलचे विश्वस्त सतीश धाडीवाल, अभयकुमार बरमेचा , गोरक्षण पांजरापोळचे प्रकाश कोठारी, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक धरमचंद फुलफगर, तिलोक जैन पारमार्थिक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गादिया, महामंत्री वसंत गादिया, सुभाष गांधी, यांचासह , अनिल बोरा अजय चोरडिया, यांच्या सह पुणे, रोहा,अहमदनगर,तळेगाव दाभाडे,पाली, महाड, मुंबई,येथून आलेले जैन संघ उपस्थित होते.
जैन समाजाच्या पंचायत भवन मध्ये सकल जैन श्री संघाचे वतीने चातुर्मासा साठी सुशोभित केलेल्या प्रकाशचंदजी केवळचंदजी बोरा धर्मसभा मंडपा मध्ये प. पू. साध्वीजींचे सकाळी १०:०० वाजता आगमन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात प. पू. साध्वींजींच्या मंगलाचरणाने झाली.
जैन पाठशालेचे विद्यार्थी व महिला मंडळाने धार्मिक गीत व नृत्य सादर केले.
प. पू. साध्वीजींचे गुरुपूजनाचा लाभ प्रकाशचंदजी आदित्यकुमारजी धारीवाल परिवार व राजेंद्रजी वर्धमानजी दुगड परिवाराने घेतला.
कल्याणकारी चातुर्मास २०२४ च्या समितीचे स्वागताध्यक्ष माननीय प्रकाशभाऊ धारीवाल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
सकल जैन श्री संघाचे वतीने माननीय आमदार अशोक पवार यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. आमदारा पवार यांनी प. पू. साध्वीजींचे आशीर्वाद घेऊन शिरुर हवेली तालुक्यतील जनतेच्या वतीने प. पू. साध्वीजींचे व सर्वच उपस्थितांचे आपल्या मनोगतामध्ये स्वागत केले व चातुर्मासा साठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन माजी नगरसेवक विजय दुगड यांनी केले.
शनिवार दिनांक २० जुलै पासून सुरु होणा-या चातुर्मास कालावधी मध्ये प. पू. साध्वीजींचे दररोज सकाळी ०८:३० वाजता प्रवचन तसेच अनेक धार्मिक कार्यक्रम, पर्युषन पर्व, तप, जप, स्वाध्याय, धार्मिक शिबीरे यांमध्ये सर्वांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
जैन धर्मात साध्वी होण्याची दिक्षा घेण्याची प्रतिज्ञा घेतलेली रोहा येथील कु. विधि विकासजी कांकरिया व तिच्या परिवाराचा सकल जैन श्री संघाचे वतीने सन्मान करण्यात आला.
प. पू. दोन्ही साध्वी, ज्या की दोन्ही सख्ख्या बहिणी आहेत, त्यांचे माता, पिता, भाऊ व परिवाराच्या सदस्यांचा सकल जैन श्री संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प. पू. साध्वीजींचे अनेक भक्तजन अनेक ठिकाणांहून आले होते. त्यामध्ये पोयनाड, रोहा, तलेगाव
दाभाडे, पाली, इंदौर, अहमदाबाद, बेंगलोर, पुणे, मुंबई, नागपूर, चणेरा इत्यादी ठिकाणाहून आलेल्या अतिर्थीचे स्वागत, सन्मान सकल जैन श्री संघाचे वतीने करण्यात आला.
धर्मसभा मंडपाचे लाभार्थी परिवार श्रीमान प्रकाशचंदजी, विनयकुमारजी, मनिषाजी, अंतरा व आयुष बोरा परिवाराचा सन्मान सकल जैन श्री संघाचे वतीने करण्यात आला.