उरळगाव येथे मेंढपाळ महिलेला मारहाण करत दीड लाखाचे सोन्याचे दागिने तिघांनी चोरून नेले

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
उरळगाव ता. शिरूर येथे माळरानावर मेंढ्या चालण्यासाठी गेलेल्या महिलेवर अज्ञात तीन जणांच्या टोळक्याने चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करत तिच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र व कानातील डोरले व कर्णफुले असा दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.
     याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       रतनबाई बापु थोरात (वय 55 वर्षेए धंदा शेती व मेंढपाळ रा उरळगाव थोरातवस्ती ता शिरूर जि पुणे)
या महिलेने फिर्याद दिली आहे.
      याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 29 जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उरळगाव ता शिरूर जि पुणे गावचे हद्दीत नंदनवन द्वास्याचे या माळरानाजवळ फिर्यादी मेंढ्या चारत असताना तीन अनोळखी इसम वय अंदाजे 25 ते 30 वयाचे मोटार सायकलवर फिर्यादी चे जवळ येवुन त्यापैकी बुटका असलेल्या इसमाने फिर्यादी ची मान जोराने पकडुन खाली पाडले व ओरडू नकोस नाहीतर सुरीने भोसकेन असा दम देवुन फिर्यादी चे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र जबरदस्तीने तोडुन घेतले व हातातील सुरीने फिर्यादीचे डावे कानाचे पाळीला कापुन दुखापत करून एक लाख 50 हजार रुपयांचा दागिने जबरीने चोरून नेले आहेत.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उगले करीत आहे. 

 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!