शिरूरच्या पाच नेमबाजांची पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

9 Star News
0
शिरूरच्या पाच नेमबाजांची पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
                   शिरूर प्रतिनीधी 
      नाशिक येथे झालेल्या एअर गन कॉम्पिटिशन मध्ये शिरूर येथील पाच नेमबाजांनी यश मिळवले असून या पाचही नेमबाजांची पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
          नाशिक येथे दिनांक २३ ते २६ जुलै महाराष्ट्र एअर गन कॉम्पिटिशन २०२४/२ ही स्पर्धा पार पडली. 
        या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये शिरूर येथील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या पाच नेमबाजांनी घवघवीत यश मिळविले १० मीटर पिप साईट एअर रायफल या प्रकारात समृद्धी चव्हाण हिने ४०० पैकी ३६८ गुण मिळविले. समीक्षा ढेरंगे हिने ३६७, उदय परदेशी ३६२, तेजस कांबळे ३३५, प्रतिक्षा वडणे हिने ३३४ गुणांची कमाई केली.
       या सर्वांची सप्टेंबर २०२४ मध्ये अहमदाबाद (गुजरात) येथे आगामी होणाऱ्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर या पूर्व-राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

          यशस्वी सर्व नेमबाज शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेमधील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब मध्ये प्रशिक्षक शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थिटे, उपाध्यक्ष धनंजय थिटे व संस्थेमधील सर्व प्राचार्य आदींनी नेमबाजांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!