केडगाव चौफुला येथे हॉटेलवर जेवण्यासाठी थांबल्यावर जमिनीच्या व्यवहारात मध्यस्थी असणाऱ्या बरोबरील एकाने जमिनीच्या व्यवहारात ॲडव्हान्स म्हणून मिळालेले ५० लाखाची बॅग चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने ओढून फरार झालेल्या आरोपीस बारा तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून ४५ लाख रुपये हस्तगत करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यवत पोलीस स्टेशन व शिरूर पोलीस स्टेशन या पथकाला यश आले आहे.
बंडू ऊर्फ गजानन सुरेश काळवाघे, (वय ४० वर्षे रा. बुलढाणा, चैतन्यवाडी ता.जि. बुलढाणा ) याला सापळा रचून अटक करण्यात आली आहे.
याबाबत शरद मधुकर डांगे (वय ७६ वर्षे रा. चैतन्य वाडी बुलढाणा ता.जि. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली होती.
केडगाव चौफुला येथील जबरी चोरीचा गुन्हा १२ तासांचे आत उघडकीस आणून एका आरोपीस ताब्यात घेवून ४५ लाख रूपये हस्तगत करणेत आले स्थानिक गुन्हे शाखा व यवत, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण कार्यवाही
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 23 जुलै रोजी रात्री ९ वाजता फिर्यादी शरद डांगे हे त्यांची सून व व्याही यांचे सोबत रघुनंदन हॉटेल चौफुला केडगाव येथे जेवणासाठी थांबले असताना. त्यांच्याबरोबर असेला बंडू काळवाघे याने फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून जमिनीच्या व्यवहारातून विसर म्हणून मिळालेली ५० लाख रुपये असलेली पैशाची बॅग जबरदस्तीने वाहनातून काढून पळून गेला होता. याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता तात्काळ घटनास्थळाला यवत पोलीस स्टेशन यांनी भेट देऊन, फिर्यादीकडे अधिकची चौकशी केली असता शरद डांगे यांची सुनबाई हिचे वडीलांची कर्नाटक इंडी या गावात जमीन होती. सदर जमीनीचा व्यवहार बंडु ऊर्फ गजानन काळवाघे यांनी विरभद्र कट्टी रा. इंडी कर्नाटक यांचेसोबत जमवून दिला. एकूण १८ एकर क्षेत्राचे व्यवहारात ५० लाख रूपये अॅडव्हान्स घेण्यात आला होता. फिर्यादी शरद डांगे, त्यांची सुनबाई, व्याही, बंडु काळवाघे असे त्यांचे कडील चारचाकी वाहनातून इंडी येथून पुण्याकडे येत असताना केडगाव चौफुला येथे जेवण करणेसाठी थांबले तेव्हा सदरचा प्रकार घडला आहे. अशी माहिती दिल्याने तपास पथकांनी बंडू काळवाघे याचा व त्याचे सोबतचे इतर दोन अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तांत्रिक विश्लेषणाद्वारे बंडू काळवाघे हा केडगाव न्हावरा रोडने शिरूर बाजूकडे जात असल्याचे माहिती मिळाल्याने त्याचा पाठलाग सुरू करणेत आला, स्थानिक गुन्हे शाखेचे शिरूर विभागातील पथक व शिरूर पोलीस स्टेशनचे मदतीने न्हावरा फाटा या ठिकाणी सापळा लावणेत आला. आरोपी बंडू ऊर्फ गजानन सुरेश काळवाघे, यास न्हावरा फाटा येथे ताब्यात घेण्यात आले असून त्याचेकडून गुन्हयात चोरी केलेली ४५ लाख रूपये रक्कम हस्तगत करणेत आलेली आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे व यवत पोलीस स्टेशन पथकाने घटनास्थळी भेट दिली. यातील फिर्यादीकडे विचारपूस केली असता, फिर्यादी शरद डांगे यांची सुनबाई हिचे वडीलांची कर्नाटक इंडी या गावात जमीन होती. सदर जमीनीचा व्यवहार बंडु ऊर्फ गजानन काळवाघे यांनी विरभद्र कट्टी रा. इंडी कर्नाटक यांचेसोबत जमवून दिला. एकूण १८ एकर क्षेत्राचे व्यवहारात ५० लाख रूपये अॅडव्हान्स घेण्यात आला होता. फिर्यादी शरद डांगे, त्यांची सुनबाई, व्याही, बंडु काळवाघे असे त्यांचे कडील चारचाकी वाहनातून इंडी येथून पुण्याकडे येत असताना केडगाव चौफुला येथे जेवण करणेसाठी थांबले तेव्हा सदरचा प्रकार घडला आहे. अशी माहिती दिल्याने तपास पथकांनी बंडू काळवाघे याचा व त्याचे सोबतचे इतर दोन अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तांत्रिक विश्लेषणाद्वारे बंडू काळवाघे हा केडगाव न्हावरा रोडने शिरूर बाजूकडे जात असल्याचे माहिती मिळाल्याने त्याचा पाठलाग सुरू करणेत आला, स्थानिक गुन्हे शाखेचे शिरूर विभागातील पथक व शिरूर पोलीस स्टेशनचे मदतीने न्हावरा फाटा या ठिकाणी सापळा लावणेत आला. आरोपी नामे बंडू ऊर्फ गजानन सुरेश काळवाघे, वय ४० वर्षे रा. बुलढाणा, चैतन्यवाडी ता.जि. बुलढाणा यास न्हावरा फाटा येथे ताब्यात घेण्यात आले असून त्याचेकडून गुन्हयात चोरी केलेली ४५ लाख रूपये रक्कम हस्तगत करणेत आलेली आहे.
आरोपी बंडू ऊर्फ गजानन काळवाघे वय वर्षे रा. बुलढाणा, चैतन्यवाडी ता.जि. बुलढाणा यास अटक करणेत आलेली असून त्याची पोलीस कोठडी रिमांड मिळणेकामी त्यास मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाची अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचेएस.डी.पी.ओ. आण्णासाहेब घोलप, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, यवत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, संजू जाधव, असिफ शेख, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, धीरज जाधव यवत पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार भानुदास बंडगर, रामदास जगताप, महेंद्र चांदणे, राजीव शिंदे, दत्ता काळे, प्रमोद गायकवाड, विकास कापरे, गणेश मुटेकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नारायण जाधव, विकी यादव, तसेच नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण येथील मपोसई भाग्यश्री जाधव, महिला पोलिस अंमलदार बी एन दळवी, पोलीस हवालदार चंद्रकांत भोसुरे यांनी केली असून पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपोंगे करत आहेत.केडगाव चौफुला येथील जबरी चोरीचा गुन्हा १२ तासांचे आत उघडकीस आणून एका आरोपीस ताब्यात घेवून ४५ लाख रूपये हस्तगत करणेत आले स्थानिक गुन्हे शाखा व यवत, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण कार्यवाही