मुखईच्या आश्रमशाळेचे राज्यस्तरिय रस्सीखेच स्पर्धेत यश
( शिरूर प्रतिनिधी ) मुखई ता. शिरुर येथील रा. गे. पलांडे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरिय रस्सीखेच स्पर्धेत सहभाग घेऊन घवघवीत यश संपादित केले असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे.
मुखई ता. शिरुर येथील रा. गे. पलांडे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी जालना येथील क्रीडा प्रबोधिनी संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे पुणे विभागाच्या वतीने सहभाग घेतला असताना पंधरा वर्षाखालील मुलींच्या संघाने सुवर्णपदक तर सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाने कांस्यपदक प्राप्त केले असून पंधरा वर्षाखालील संघाने बीड, लातूर, संभाजीनगर, जालना या संघांना पराभूत करून विजेतेपद पटकावल्याने सर्व खेळाडूंना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. सदर संघात श्रावणी गायकवाड, कादंबरी सादगिले, गौरी घुले, साक्षी वामन, सिद्धी भांडवलकर, लावण्या पलांडे, संध्या झावरे, संस्कृती दराखे, ऐश्वर्या भुजबळ या खेळाडूंचा समावेश होता या संघामधून काही खेळाडूंची आग्रा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्यासाठी सांडी प्राप्य झाली आहे, या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक गणेश लांडे, मनोज धिवार, किरण झुरंगे, नंदा सातपुते, मंगल शेळकंदे यांनी मार्गदर्शन केले होते. तर सर्व यशस्वी खेळाडूंचे महाराष्ट्र रस्सीखेच असोसिएशनच्या अध्यक्षा माधवी पाटील, सचिव जनार्धन गुपिले, पुणे जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव माधव बागल यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो खालील ओळ - मुखई ता. शिरुर येथील यशस्वी खेळाडूंना सन्मानित करताना पदाधिकारी.