पोलिस व नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर पाबळ चौक येथे चालत्या कारने पेट घेतल्याने खळबळ उडाली मात्र पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहाणी झाली नाही मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक येथे प्रवाशी वाहतूक करणारी स्विफ्ट कार एम एच १४ जि यु २५१७ हि कार घेऊन सचिन गुल्लाने हा आलेला असताना पाबळ चौक येथे कारच्या पुढील भागातून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आल्याने चालकाने कार रस्त्याचे कडेला घेतली असताना अचानक कारला आग लागल्याने खळबळ उडाली, घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मिलिंद देवरे, शंकर साळुंखे, विकास पाटील, अमोल दांडगे, ज्ञानदेव गोरे, अंतेश्वर यादव, गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुकीवर नियंत्रण आणत नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली, सुदैवाने यावेळी कोणतीही हानी झाली नाही मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर आग कार मधील शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा अदाज वर्तवला जात आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे चालत्या कारने घेतलेला पेट ( छायाचित्र – शेरखान शेख )