न्हावरे ता. शिरूर घोडगंगा साखर कारखाना बंद पाडुन बॅंकेने ताबा घ्यायचा आपणच लिलावात घ्यायचा या नाटकाचा कटाचा पहिला अंक आमदार अशोक पवार यांनी पूर्ण केला

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडुन बॅंकेने ताबा घ्यायचा आणि लिलाव पद्धतीने पुन्हा स्वतःच दुसर्‍याच्या नावाने खरेदी करायचा या नाटकाचा व कटाचा पहीला अंक आमदार आशोक पवार यांनी सुरू केला असल्याचा आरोप भाजपचे उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेशा उपाध्यक्ष श्री.संजय पाचंगे यांनी केला असुन इतर बॅंकांकडुनही आगामी काळात अशीच कारवाई होऊ शकते अशी शक्यता ही पाचंगे यांनी बोलुन दाखवली असुन लवकरच याबाबत आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगून घोडगंगा कोणत्याही परिस्थितीत खाजगी च्या घशात जाऊ नये यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. 
 २०१८/१९ पासुन पाचंगे यांनी सातत्याने हा कट शिजत असल्याचे सांगत आहेत, त्यांनी दोन वेळा उपोषणही केली आहेत. 
बॅंकेकडुन घोडगंगा कारखान्याचा ताबा घेऊनही तालुक्यातील राजकीय वर्तुळात आश्चर्यकारक शांतता आहे. 
         शिरूर तालुक्यात आमदार अशोक पवार यांची पिताश्री रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता अखेर बँक ऑफ बडोदा यांनी कर्ज न भरल्यामुळे ताब्यात घेतली असल्याने शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

          शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा
असलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच आता कारखान्याची मालमत्ता बँक ऑफ बडोदाने २७ जून रोजी ताब्यात घेतली आहे. याबाबत बँकेने ताबा नोटीस वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली आहे. बँक ऑफ बडोदाने केलेल्या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, तसेच आमदार अशोक पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.

            बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताबा नोटीसमध्ये म्हटले आहे की, बँक ऑफ बडोदाचे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल अॅसटेस् अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ च्या सेक्शन १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट रुल्स् २००२ च्या रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार मे. रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखानयाला २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मागणी नोटीस बजावली होती. सदर नोटीसमध्ये नमूद केलेली आणि बँकेला येणे असलेली एकूण रक्कम रु. ९२०.०० लाख आणि त्यावरील व्याज अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, वरील कायद्याच्या सेक्शन १३ (४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ च्या रुल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेचा २७ जून २०२४ रोजी ताबा घेतला आहे.

विशेषतः वर नमूद केलेले कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो बैंक ऑफ बडोदा यांना येणे असलेली रक्कम रु. ९२०.०० लाख आणि त्यावरील व्याज अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहील, असेदेखील या ताबा नोटीसमध्ये म्हटले आहे.


सध्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने यंदाचा गळीत हंगाम होऊच शकला नाही. त्यातच कामगारांनी चार महिन्यांपूर्वी थकीत १६ महिन्यांचा पगार आणि इतर मागण्यासाठी आंदोलन केले होते. बँकेने केलेल्या कारवाईमुळे शिरूरचे आमदार अशोक पवार हे अडचणीत सापडले असून त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूर कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्वाचे आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!