शिरूर
( प्रतिनिधी ) केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज शालेय गरजू मुलांना नुकतेच वह्या व पेनचे वाटप करण्यात आल्याने शालेय मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत असल्याचे दिसून आले.
केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व व ज्युनिअर कॉलेज येथे शालेय गरजू मुलांना निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शंभर शालेय गरजू मुलांना वह्या व पेन वाटप करण्यात आले, यावेळी प्राचार्य अनिल साकोरे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, शरदचंद्र पवार विद्यालय वढूचे प्राचार्य एकनाथ चव्हाण, शिरूर हवेली शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, संस्थेचे पुणे विभागिय सदस्य रामशेठ साकोरे, महादेव पाटील, चंद्रकांत थिटे, रमेश गावडे, संजय जोहरे, बालासाहेब धस, मनोज दोंड, राजु पानमंद, रविंद्र उघडे, सारिका पाटील, प्रतिभा शिर्के, प्रशांत गलांडे, प्रशांत गांजरे, सुरेश गायकवाड, नंदुलाल बहिरम, निरंजन शिंदे, पुष्पराज पऱ्हाड आदी उपस्थित होते, दरम्यान यावेळी बोलताना शालेय गरजू मुलांना शालेय साहित्यांचे वाटप होणे गरजेचे असताना गरजू मुलांना वह्या पेन उपलब्ध झाल्याने त्यांना मोठा मदतीचा हात मिळाला असल्याचे मत प्राचार्य अनिल साकोरे व प्राचार्य एकनाथ चव्हाण यांनी व्यक्त केले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश गावडे यांनी केले तर महादेव पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – केंदूर ता. शिरुर येथे शालेय गरजू मुलांना साहित्य वाटप प्रसंगी पदाधिकारी.