रामलिंग शिरूर येथील जामदार कुटुंबियांनी घातले चक्क कपिला गायचे डोहाळे जेवण

9 Star News
0
शिरूर, दिनांक २८ (प्रतिनीधी)
    रामलिंग शिरूर येथे साडी चोळी... सर्व प्रकारची फळे... सुवासिनींच्या हस्ते तिचे औक्षण करून पूजा.. हारांनी फुलांनी सजवलेली... राधा कृष्णाची मूर्ती..मोराची पिसे... आवडता घास भरवत.. साडी खणनारळची ओटी भरण... आणि सोबतीला 
 सुहासिनीच्या मधुर आवाजात डोहाळ गाणे...हे काय कोणा महिलेची डोहाळे जेवण नाही तर हे चक्क हिराबाई रामदास जामदार यांच्या कपिला गायीचे डोहाळे जेवण... या आगळ्यावेगळ्या डोहाळ जेवणाची शिरूर पंचक्रोशी व तालुक्यात चर्चा रंगली आहे.
       रामलिंग शिरुर येथील जामदार कुटुंब यांची लाडकी कपिला गाय गरोदर असल्याने या कुटुंबीयांना तिचे डोहाळे जेवण करावयाचे ठरले आणि लगबग सुरू झाली आजूबाजूंच्या सुहासिनीला कपिलाच्या डोहाळ जेवणाचे आमंत्रण डोहाळ जेवणाची तयारी सुरू कपिलेला फुलांनी हारांनी सजवली. आवडते फळे आवडता चारा आणि साडी चोळी सजवलेला साज. पेढे आणि तिला आवडते पदार्थ दिमतीला आणले. आजूबाजूच्या सुवासिनी नटून खटून सोबत भेट वस्तू आणत मोठ्या दिमाखित कपिलेच्या डोहाळ जेवणासाठी जमल्या होत्या. 
           सर्व सुवासिनींनी कपिला आपल्या गोमातेला हळदी कुंकवाचा औक्षण करून तिची आरती उतरली. तिला गोड धोड पदार्थ खाऊ घातली. तिला भेटवस्तू दिली. आणि डोहाळे गाणीही गाऊन या कपिले गाईच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला चार चांद लावले.
          या आगळ्यावेगळ्या कपिला गायीच्या डोहाळ जेवणाची चर्चा संपूर्ण शिरूर पंचक्रोशी व शिरूर तालुक्यात आज होती. 
           मुक्या प्राण्यांना जीव कसा लावावा त्यांचे पालन पोषण कसे करावे पोटच्या मुलीप्रमाणे तिची देखभाल कशी करावी हे सर्व आज डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातून जामदार कुटुंबियांनी दाखवून दिले आहे. 
       यावेळी रामलिंग उन्नती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राणीताई कर्डिले, सुनंदा घावटे,रोहिणी जामदार,कोमल जामदार,सविता जामदार,स्नेहा जामदार, वर्षा जामदार,मीरा घोडके,संगीता मोहळकर अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.
     गाय हा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा असून,तिला गोमाता म्हटले जाते, हिंदू धर्मामध्ये पूजा केली जाते. तसेच गाईला हिंदू धर्मामध्ये उच्च स्थान आहे. गाईच्या पाडसाला वासूरू असे म्हणतात. गाईचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे. श्रीकृष्ण यांना गाय अतिशय प्रिय होती. त्यामुळे गायीची पूजा हे अनंत कालापासून चालत आलेली आहे.
भारतीय गाईच्या संकरित जाती आहेत तसेच विदेशी गाई सुद्धा आहेत. भारतामध्ये गाईपासून दूध मिळवले जाते. त्या व्यतिरिक्त गाईपासून शेण मिळते. जे आपण शेतामध्ये खत म्हणून उपयोगी आणू शकतो.
या खतामुळे शेतातील जमिनीतील पोषक मूलद्रव्य निर्माण होऊन पीक उत्पादनात वाढ होते. गाईचे गोमूत्र देखील हिंदू धर्मात पवित्र मानले जाते त्यापासून शरीरशुद्धी केली जाते. गायीचे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही हे पंचामृत एक दिव्य औषधी आहे. 
राणी कर्डीले अध्यक्ष,रामलिंग उन्नती बहुउद्देशीय संस्था
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!