शिरूर येथे गुरुपौर्णिमा निमित्त गुरुरत्न पुरस्कार प्रदान

9 Star News
0

शिरूर दिनांक २१ प्रतिनीधी 
शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा निमित्त अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गुरुरत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात आला.
         शिरूर येथील ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न झाला.
          यावेळी शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार श्री अशोक बापू पवार यांनी जीवनात गुरूचे स्थान महत्त्वाचे असून, त्यांचा प्रती आदर हा नेहमीच असला पाहिजे ,आज विविध क्षेत्रात गुरूचे महान कार्य करणारे या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व गुरूरतन पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल सर्वांचेअभिनंदन कऱण्यात आले.
        यावेळी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा - राणी कर्डिले यांनी आई वडील यांचे जीवनातील स्थान व गुरू विषयी आदर व्यक्त केला.
          यावेळी गुरूरतन पुरस्कार शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार ॲड.अशोक पवार यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातील बी.के.अर्चना दिदी,शकुंतला दिदी,सुप्रिया दिदी,वासंती दीदी,वेदिका दिदी,अमृता दिदी,पूजा दीदी,वैशाली दीदी,सुमन दिदी,पूनम दिदी,अर्पिता दिदी,सुशीला दिदी,जीवनविद्या मिशन - शामकांत मामा वर्पे, ह .भ. प.रामदास महाराज फडके, ह.भ. प.ज्ञानेश्वर महाराज रासकर , महेश रासने,सनातन संस्था - पंचफुला सोनटक्के यांना सन्मान चिन्ह, शाल,श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
       यावेळी शहर महिला अध्यक्ष डॉ .स्मिता कवाद,युवती शहर अध्यक्ष गीता आढाव,शोभना पाचंगे,सुनंदा घावटे,सागर नरवडे, बिजवंतकाका शिंदे,रवींद्र खांडरे,सुरेश नाना पाचर्णे,निलेश पवार,अमोल चव्हाण, भाग्यश्री लिंगे,कल्पना चांदगुडे,रोहिणी रासकर,शिला पाचंगे आदी महिला मान्यवर उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!