शिरूर दिनांक २१ प्रतिनीधी
शिरूर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रथम गुरु हे आई वडीलच असतात हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात आले व गुरुौर्णिमेच्या निमित्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई-वडिलांची पाद्यपूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली.
या कार्यक्रमासाठी शिरूर मधील जीवन विद्या मिशन शिरूरच्या अध्यक्षा संगीता पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.समीर ओंकार त्याचबरोबर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शिवदास झासकर, पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयक डायना बोर्डे , प्राथमिक विभागाचे समन्वयक लवू धारजे तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक यावेळेस उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त इयत्ता तिसरी ते दहावीच्या मुलांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले, तर इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांनी लघु नाटिका आणि नृत्य सादर केले त्यासाठी शाळेच्या शिक्षिका प्रिया नरवडे यांनी मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका प्रिया नरवडे यांनी केले.