शिरूर
(प्रतिनीधी ) शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष शर्मिला अर्जुन निचित यांनी राजीनामा दिल्याने नुकत्याच झालेल्या निवडी दरम्यान शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष पदी संतोष जयसिंग विधाटे यांची तर तज्ञ संचालकपदी अशोक दिनकर धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष शर्मिला अर्जुन निचित यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने उपाध्यक्षपद रिक्त झाले होते, त्यांनतर सहाय्यक निबंधक ए. एच. धायगुडे यांच्या नियंत्रणाखाली नुकतीच शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत खैरे, मानद सचिव रामचंद्र नवले, खजिनदार मानसी थोरात, संतोष विधाटे यांसह आदी सदस्य उपस्थित होते, यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षपदी उपाध्यक्ष पदी संतोष जयसिंग विधाटे यांची तर तज्ञ संचालकपदी अशोक दिनकर धुमाळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा हस्ते सन्मान करण्यात आला, याप्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी बाळकृष्ण कळमकर, अखिल शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन, पदवीधर शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक कर्डीले, सखाराम फंड, संभाजी धुमाळ, कल्याण कोकाटे, अशोक पठारे, अर्जुन निचित, सुरेश थोरात, रामदास कौठाळे यांसह आदी उपस्थित होते.
सोबत - संतोष विधाटे व अशोक धुमाळ यांचा फोटो.