शिरूर
( प्रतिनिधी ) तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील तळेगाव ढमढेरे ते विठ्ठलवाडी रस्त्याचे कडेला भले मोठे धोकादायक व वाळलेले झाड असून सदर झाडामुळे मोठा अनार्थ होण्याची शक्यता असल्याने सदर झाड हटवण्याची मागणी नागरिक करत आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील तळेगाव ढमढेरे ते विठ्ठलवाडी रस्त्याचे कडेला पूर्णपणे वाळलेले भले मोठे धोकादायक झाड असून या झाडाखाली असलेल्या रस्त्यावर दिवसभर शेकडो वाहने तसेच शाळकरी मुले जात असतात मोठ्याने वारा आल्यास सदर झाड अथवा झाडांच्या फांद्या तुटण्याची शक्यता असल्याने भाविष्यात मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे, मात्र होणारा अनर्थ टाळण्यासाठी प्रसासनाने वेळीच दखल घेऊन सदर झाड हटवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.
स्वतंत्र चौकट १ –
तळेगाव ढमढेरे येथील सदर झाडाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग यांना पत्रव्यवहार करुन झाड हटवले जाईल असे तळेगाव ढमढेरेचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ - तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील विठ्ठलवाडी रस्त्याचे कडेला असलेले धोकादायक झाड.