जातेगाव बुद्रुकमध्ये रंगला माजी विद्यार्थी मेळावा विद्यार्थ्यांच्या आठवणींना मिळाला सत्तावीस वर्षांनी उजाळा

9 Star News
0
जातेगाव बुद्रुकमध्ये रंगला माजी विद्यार्थी मेळावा
विद्यार्थ्यांच्या आठवणींना मिळाला सत्तावीस वर्षांनी उजाळा
शिरूर 
( प्रतिनिधी ) जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेऊन पुढील वाटचाल करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला असून यावेळी शाळेसाठी इमारत बांधण्यासाठी मदत करण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.
                      जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये १९९७ साली सातवीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी नुकतेच माजी विद्यार्थी मेळाव्याचे निमित्ताने एकत्र आले होते, यावेळी तब्बल सत्तावीस वर्षांनी एकत्र आल्याने सर्वजण जुन्या आठवणीत रंगून गेले, यावेळी माजी विद्यार्थ्यांनी तत्कालीन शिक्षक विजय कुंभार, शोभा डफळ, महादेव क्षीरसागर, तुकाराम क्षीरसागर यांसह सध्या शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक विजय गायकवाड, अंजली शिंदे या शिक्षकांचा सन्मान केला, दरम्यान काही दिवंगत गुरुजनांसह काही माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेक शिक्षकांसह काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले मात्र यावेळी अनेकांना गहिवरून आले, तर वर्गशिक्षक विजय कुंभार गुरुजी यांनी त्यांच्या भाषणांमधून गतकाळातील आठवणींना उजाळा दिला, तर यावेळी ज्या शाळेने आम्हाला घडवले त्या शाळेची इमारत जुनी झाली असल्याने शाळेच्या नवीन इमारत बांधण्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने यथोचित मदत केली जाईल असे आश्वासन सर्व माजी विद्यार्थ्यांनी दिले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश इंगवले यांनी केले तर प्रास्ताविक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व माजी विद्यार्थी हनुमंत पवार यांनी केले आणि राजाराम पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ - जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथे तब्बल सत्तावीस वर्षांनी एकत्र आलेले माजी विद्यार्थी.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!