शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील सी एस भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडूंनी नुकतेच जिल्हास्तरीय कब्बडी व क्रिकेट खेळामध्ये घवघवीत यश संपादित करत सुवर्णपदक पटकावले असल्याची माहिती क्रीडा प्रशिक्षक स्वप्नील भिसे व चेतन जाडकर यांनी दिली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील सी एस भुजबळ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडूंनी इंग्लिश मिडीयम स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने बारामती येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरिय कब्बडी व क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता, यावेळी सी. एस. भुजबळ इंग्लिश मिडियम स्कूलच्या खेळाडूंनी बारा, चौदा व सतरा वर्षे वयोगटातून सहभाग घेतलेला असताना तीनही वयोगटातील खेळाडूंनी कब्बडी व क्रिकेट स्पर्धेत घवघवीत यश मिळवत तीनही संघाने सुवर्णपदक पटकावले, या तिन्ही संघातील खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक स्वप्नील भिसे व चेतन जाडकर यांनी मार्गदर्शन केले, तर सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे संस्थचे अध्यक्ष विक्रम भुजबळ, उपाध्यक्ष सागर सायकर, प्राचार्य ए. जे. जोमान, राणी भुजबळ, अपर्णा लोखंडे यांनी अभिनंदन केला आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथील भुजबळ विद्यालयाचे यशस्वी खेळाडू.