वाघोली ता .हवेली येथील दरोड्यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाला यश

9 Star News
0
वाघोली ता .हवेली येथील दरोड्यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाला यश
शिरूर दिनांक 
       वाघोली येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील  पाहिजे पाच आरोपीना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले असून, पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरी चे सर्वत्र कौतुक होत आहे.
           कुमार मोहन पवार (वय २२ वर्षे, रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे), नितीन मोहन पवार (वय १९ वर्षे, रा.मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे), ओम लक्ष्मण गव्हाणे (वय १९ वर्षे, रा. लेन नं. २. साई सत्यम पार्क, उबाळेनगर, वाघोली, पुणे), मनोज सुखदेव निंबाळकर (वय २१ वर्ष. रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे),विकास दिगंबर कांबळे (वय २१ वर्षे, रा. लेन नं. २६ उबाळेनगर, वाघोली, पुणे) या पाच दोरोड्यातील आरोपींना ताब्यात घेतले आहे.
          याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील पमाणे गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अंमलदार प्रतिबंधक गस्त करीत असताना समीर पिलाने  ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे* यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, वाघोली दरोड्यात पाहिजे असलेली पाच आरोपी हे आव्हाळवाडी ते खराडी बायपास रोडवरील बायफ कंपनी जवळ लाल रंगाचे स्विफ्ट गाडीचे उभे आहे अशी माहिती मिळताच माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने या भागात आपला रचला व शिताफीने कुमार पवार, नितीन पवार, ओम गव्हाणे, मनोज निंबाळकर, विकास कांबळे पाच आरोपींना ताब्यात घेतले.
     आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कार तपासकामी जप्त करण्यात आली आहे.  आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन केले आहेत. आरोपी विरोधात पो.स्टे.गु.र.नं. ७३४ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२),१४०(३),३५१(२) गुन्हा दाखल आहे.
         सदरची उल्लेखनीय कामगिरी  पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त  रंजनकुमार शर्मा,  अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे,  सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे - २ सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट - ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश ताकवणे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!