मुरूम टाकण्यासाठी महिन्याला पंधरा हजार रुपये हप्ता न दिल्याने गाडीचे नुकसान व मारहाण केल्या प्रकरणी आठ जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे खंडणी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश बाळासो महाडीक (वय २४ धंदा, रा. करडे ता. शिरूर जि. पुणे ) फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी घ्या उर्फ अभिषेक मिसाळ, सकेत महामुनी ,बाला शिंदे (सर्व रा. शिरूर ), शुभम (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही),नवनाथ कलींदर, टिनु शेळके व रोहन पचमुख (सर्व रा. रांजणगाव ता. शिरूर पुणे), सुरज पाडळे रा. सोनेसांगवी ता. शिरूर पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 29 जुलै दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एस. व्ही. एस कंपनी येथील किरण रोडे याचे एक निळ्या रंगाचा बंद टपरीजयळ फिर्यादी त्यांचे कार मधुन जात असताना घ्या उर्फ अभिशेक मिसाळ, सकेंत महामुनी व त्यांचे बरोबर एक अनोळखी मुलगा यानी त्याचे जवळी पल्सर मोटाररसायकल आडवी मारून फिर्यादीस थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादी तेथून कार घेवून पळून गेले. नतर दुपारी दोनच्या सुमारास समाधान चौक, करडे ता. शिरूर जि. पुणे येथे फिर्यादीनी मुरूम टाकण्या करीता महीन्याला 15 हजार रूपये हप्ता न, दिल्याचे कारणावरून आरोपींनी बेकायदा गर्दी जमाव जमवून फिर्यादी यांचा हायवा ट्रक न. एमएच 12 युएम 9879 अडवुन चालक जावेद हमीद शेख यास हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून त्यांचे हातातील लाकडी दाडके व दगडाने मारून हायवा ट्रकचे नुकसान केले आहे. त्यामुळे वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे करीत आहे.