तळेगाव ढमढेरेत बिबट्या पकडण्यासाठी लावला पिंजरा

9 Star News
0
तळेगाव ढमढेरेत बिबट्यासाठी लावला पिंजरा
शिरूर 
( प्रतिनिधी ) तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील भोसेवासरी परिसरात नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत अल्स्याने नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने येथे नुकताच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे.
                तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील भोसेवासरी परिसरात दिवसाढवळ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने वनविभागाच्या वतीने परिसरात पाहणी केली असता बिबट्याचे ठसे आढळून आल्याने येथे पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली होती, त्यांनतर शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीमंडल अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व रेस्क्यू टीम मेंबर शेरखान शेख, सर्पमित्र शुभम वाघ यांनी सदर ठिकाणी पिंजरा लावला असून वनविभागाने दाखवलेली तत्परता व घेतलेली खबरदारी याबाबत नागरिक समाधान व्यक्त करत आहे. तर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना एकटे शाळेत पाठवू नये, रात्रीच्या वेळी उजेड ठेवावा, लहान जनावरे आतमध्ये बांधावी असे आवाहन वनपरीमंडल अधिकारी गौरी हिंगणे यांनी केले आहे.
फोटो खालील ओळ – तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे पिंजरा लावताना वनविभागाचे पथक.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!