शिरूर
( प्रतिनिधी ) केंदुर ता. शिरुर येथील एका चायनीज सेंटर मध्ये चायनीज खाल्ल्याचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मुकेश संतोष सुपेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंदुर ता. शिरुर येथे प्रवीण ताठे यांचे जय मल्हार चायनीज सेंटर असून सदर हॉटेलमध्ये मुकेश सुपेकर हा चायनीज खाण्यासाठी आलेला होता, चायनीज खाल्ल्यानंतर मुकेश तसाच निघून चालल्याने प्रवीण यांनी त्याच्याकडे पैसे मागितल्याने मुकेश याने मी पैसे देणार नाही असे म्हणत शिवीगाळ करत हॉटेल मधील कढई तसेच आदी लोखंडी वस्तू घेऊन प्रवीण यांना मारहाण करत जखमी केले, याबाबत प्रवीण सुखदेव ताठे वय २८ वर्षे रा. केंदुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी मुकेश संतोष सुपेकर रा. केंदुर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहे.