शिरूर शहरा अंतर्गत रस्त्यावर निकृष्ट दर्जाचेचे स्पीड ब्रेकर टाकले असून, काही दिवसातच हे स्पीड ब्रेकर तुटले असून यामुळे शिरूर नगर परिषद व निकृष्ट स्पीड ब्रेकर टाकणारे ठेकेदार या दोघांच्या भ्रष्ट कारभारामुळे शिरूर येथील नागरिकांना नाहाक त्रास होत आहे.
शिरूर शहरात पाबळ फाटा ते पोलीस स्टेशन जवळील पुलापर्यंत शिरूर नगर परिषदेच्या वतीने अपघात होऊ नये म्हणून नागरिकांच्या मागणीनुसार शिरूर नगर परिषदेने स्पीड ब्रेकर टाकले आहे. ही चांगली गोष्ट आहे यामुळे अपघात होण्यास मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.
परंतु हे स्पीड ब्रेकर बसवणारा ठेकेदार यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे स्पीड ब्रेकर प्लॅस्टिक सारखे लावले आहेत. हे स्पीड ब्रेकर घेताना शिरूर नगर परिषदेच्या वतीने या स्पीड ब्रेकर बाबतच्या काही तांत्रिक बाबी तपासले आहेत का ? पुना मुंबई मध्ये अशाच प्रकारचे स्पीड ब्रेकर लावलेले असतात परंतु ते स्पीड ब्रेकर अतिशय भक्कम असतात. शिरूर शहरात लावलेले स्पीड ब्रेकर काहींना दुसऱ्या वेळेस लावले आहेत परंतु हे स्पीड ब्रेकर कचाकड्यासारखे भुगा होऊन तुटताना दिसत आहे.
त्यामुळे शिरूर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. यामुळे निकृष्ट दर्जाचे स्पीड ब्रेकर लावून शिरूर नगर परिषद व ठेकेदार यांच्या मिली भगतीचे दर्शन होत आहे.
तुटलेल्या स्पीड ब्रेकर मधून त्याला जमिनीशी भक्कम ठेवण्यासाठी लावलेले स्क्रू मात्र मोठे भक्कम आहे. परंतु काही ठिकाणी हे स्क्रू शिल्लक राहिल्याने यामुळे दुचाकी वाहने चार चाकी वाहने पंचर होण्याचे प्रमाण वाढले आहे. किंवा यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे स्पीड ब्रेकर गर्दीच्या ठिकाणी वाहने हळू जावीत,शाळेच्या ठिकाणी वाहन हळू जावे त्यासाठी लावली आहे परंतु काही दिवसातच हे स्पीड ब्रेकर बारीक बारीक ठीचरे होऊन तुटू लागले आहे. त्यामुळे वाहनेही जोरात जाऊ लागली आहे. एवढा मोठा खर्च नगर परिषदेच्या वतीने करून कुठलीही क्वालिटी नसलेले स्पीड ब्रेकर लावून ठेकेदार व परिषद यांचे भ्रष्ट कारभाराचे दर्शन दिले आहे असेच म्हणावे लागेल.
नगर परिषदेच्या वतीने लावण्यात आलेले हे स्पीड ब्रेकर एवढे निकृष्ट दर्जाचे आहेत की त्याचे लहान लहान तुकडे पाहूनच कारभार काय बरोबर नाय असेच शहरातील नागरीक सांगताना दिसत आहे.