उरण व शिळफाटा येथे झालेल्या महिला अत्याचाराचा निषेध करुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी

9 Star News
0
उरण व शिळफाटा येथे झालेल्या महिला अत्याचार आता निषेध महिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
     उरण, शिळफाटा येथे महिला अत्याचाराच्या घटना घडल्या असून या घटनेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने निषेध करीत या दोन्ही घटनांचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा व आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी करीत महिलांनी शिरूर तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.
       राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली परंतु 
 गेल्या महिन्या भरात उरण आणि शिळफाटा येथे 
महिलांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा निर्दयपणे खुन करण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत त्यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून याच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन करण्यात आले.
    यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन नायब तहसीलदार गोसावी यांनी स्वीकारले.
तसेच महिलांनी या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय घोषणा दिल्या,हातात काळ्या फिती बांधून जाहीर निषेध केला. 
        यावेळी शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार ॲड.अशोक पवार,राणी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शामकांत वर्पे,सुरेश पाचर्णे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष डॉ .स्मिता कवाद,गीता आढाव,संगीता शेवाळे,ज्योती लोखंडे,शीतल शर्मा,संगीता रोकडे,शशिकला काळे, रोहिणी बनकर,सविता बोरुडे,कल्पना चांदगुडे,दुर्गा ननवरे,प्रीती बनसोडे,रवींद्र खांडरे,अमित शिर्के,सागर नरवडे,युवराज सोनार,राहील शेख,कलीम सैयद,अर्शद शेख, , अक्षय सोनवणे, कुणाल काळे आजी माजी सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वाऱ्यावर असल्याचे दर्शवनाऱ्या आहेत.
नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने निर्दयीपणे पिडितेच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन तिचे हाल हाल करून तिला मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न करून तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केल्याचे निदर्शनास आले आहे
तर दुसऱ्या घटनेत बेलापूर येथिल तीस वर्षीय महिला घरगुती भांडण झाल्याने मानसिक शांतता मिळावी म्हणून डायघरजवळील शीळ फाटा येथिल गणेश घोळ मंदिरात गेली होती. येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी त्या महिलेला चहातून गुंगीचे औषध देऊन या महिलेवर आळीपाळीने बलात्कार करत तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या दोन्ही घटनांमध्ये माणुसकीला काळिमा फासला गेला आहे या घटनांमुळे
राज्याचे गृह खाते निद्रिस्त असुन
 राज्यात महिला असुरक्षित असल्याचे जाणवत असून या घटनांमुळे राज्याच्या गृह खात्याचा अब्रु चव्हाट्यावर आली आहे
या दोन्ही घटना अमानवीय असुन निषेधार्ह आहेत या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि निद्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी व घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून घटनेतील पाषाण हृदयाच्या आरोपींना फाशीशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!