शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील शिंगाडवाडी ते चिंचोली मोराची (शास्ताबाद) या रस्त्यासाठी राज्याचे सहकामंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी २ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिली आहे.
शिंगाडवाडी ते चिंचोली मोराची (शास्ताबाद) या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी
या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सहकार मंत्री वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी शिंगाडवाडी ते चिंचोली मोराची (शास्ताबाद) या रस्त्याच्या कामासाठी तब्बल २ कोटी ८ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून दिला.
७ जुलै रोजी रोजी या रस्त्याची पाहणी करताना आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगभैय्या पाचुंदकर, वरूडे गावचे आदर्श सरपंच संतोष भरणे तसेच शिंगाडवाडीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष शालेयशिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य आजी-माजी सैनिक तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.