रांजणगाव गणपती येथे खंडणी मागणाऱ्या सातजणावर गुन्हे दाखल

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
           शिरूर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील चार कामगारांचे ढोक सांगवी येथून अपहरण करून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडे ७५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याबद्दल सात जणांवर रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक करण्यात आली आहे.
          संतोष मनमोहन बेहरा (वय 19 वर्षे, व्यवसाय नौकरी, सध्या रा. ढोकसांगवी, व्हिल्स , ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा. समरपुर, ता. अहलापुर, उडीसा), यांनी फिर्याद दिली आहे.
           याबाबात योगेश बारवकर (रा. शिरुर, ता. शिरूर, जि.पुणे) विनोद राजेंद्र चाबुकस्वार (रा. शिरुर, सुरजनगर, ता.शिरुर, जि.पुणे) व त्यांचे अनोळखी इतर पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादी व त्याचे मित्र  संतोष बेहरा, सुदर्शन बेहरा, संतोष परिडा  ढोकसांगवी गावच्या हद्दीत पाचंगे वस्ती
असताना चौघांना योगेश बारवकर याने त्याच्या अनोळखी पाच साथीदारांसह त्यांच्याकडील स्कुटी, प्लॅटिना व पल्सर मोटार सायकलवरुन येवुन जबरदस्तीने मारहाण करून त्यांचेकडील तिन्ही मोटार सायकलवरून अपहरण करुन चौघांना कारेगावचे हद्दीतील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोरील रोहन मार्बल्स दुकानाच्या पाठीमागील चार मजली इमारतीमधील तिस-या मजल्यावरील एका खोलीमध्ये नेवुन प्लॅस्टिकच्या पाईपाने, कंबरेच्या बेल्टने मारहाण केली. व "तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर, प्रत्येकाने २५हजार द्या अशी मागनी केल्यावर फिर्यादी तसेच संतोष बसंत बेहरा, सुदर्शन नबगन बेहरा असे तिघांच्या नातेवाईकांनी त्यांचे मोबाईलवरती फोन पे द्वारे पैसे पाठविल्यावर तिघांचे एकुण ७५ हजार रुपयेची खंडणी योगेश बारवकर याने त्याच्या सोबतच्या व्यक्तीच्या मोबाईलवरील स्कॅनरवरुन घेतली. तसेच रात्री साडेअकरा वाजण्याचे सुमारास संतोष परिडा याचे पैसे घेण्यासाठी फिर्यादीचा भाऊ मानस बेहरा याच्याकडे कारेगाव चौकातील, कारेश्वर मंदिर येथे योगेश बारवकर हा त्याचा साथीदार विनोद राजेंद्र चाबुकस्वार याच्याकडील पांढ-या रंगाच्या टाटा अल्ट्रोज गाडी क्र.MH 12 VC 4879 हि मध्ये फिर्यादी व त्याचे दोन मित्रांना घेवुन आला असता त्यांना पोलीसांनी पकडण्याच प्रयत्न केला त्यावेळी योगेश बारवकर हा त्या ठिकाणावरुन पळुन गेला आहे. फिर्यादी वरून गुन्हा रांजणगाव पोलीस स्टेशन येथे खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे करीत आहे. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!