महाराष्ट्र राज्य व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार असून, त्याबाबत तुम्हाला काळजी करायची गरज नाही असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझी प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांना दिला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी
महिला वर्गामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये तुम्ही किती संभ्रम निर्माण करा परंतु ही योजना चालूच राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर सांगितले .
शिरूर येथील नागरी सत्कारामध्ये खासदार कोल्हे यांनी शासनाच्या विविध योजनांवर टीका केली आहे ..या टीकेला उत्तर देताना सोंडेकर यांनी खासदार कोल्हे यांना चांगले सुनावले आहे. खासदार साहेब तुमचा अनुभव कमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महाराष्ट्र शासनाचा अनुभव हा मोठा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
शेतकऱ्याच्या दुधाला भाव शेतमालाला भाव देण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही त्यासाठी महायुती सरकार सक्षम आहे. तुम्हाला शेतकरी शेती आणि दुधाचा जास्तच कळवळा असेल तर शिरूर चा घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करून दाखवा. जो कारखाना तुमच्या लाडक्या आमदार अशोक पवार यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून बंद केला आहे. त्याबाबतही शिरूरच्या कार्यक्रमात बोलणे आपल्या कर्तव्य होते परंतु आपलं ठेवायचे दाखवून आणि दुसरे ते बघायचे वाकून ही तुमची रणनीती आहे.
शिरूर तालुक्यातील हवेली तालुक्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कोण सोडवणार मागील पाच वर्षात आपण तर शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरकलेच नाही. याबाबत प्रचारादरम्यान आपल्याला नागरिकांकडून समजले आहे. आता तरी शहाणे व्हा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा जनतेची कामे काय असते ते तुम्हाला कळेल .एकदा शिरूर तालुक्यातील पूर्व भागात फिरून पहा घोडगंगा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे.
तीच अवस्था हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद असल्याने आहे. तुम्हाला जास्तच कळवळ असेल तर हे दोन्ही कारखाने सुरू करा नंतर दुसऱ्यावर टीका करा अन्यथा टीका आम्हालाही करता येते असा इशारा चंदन सोंडेकर यांनी दिला आहे.adv
