शिरूर
( प्रतिनिधी ) हिवरे कुंभार ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून नुकतेच गावातून वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आलेल्या मुलांच्या वेगवेगळ्या वेशभूषेने ग्रामस्थांची मने जिंकल्याचे दिसून आले.
हिवरे कुंभार ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अंजना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच शालेय बालचमुंच्या वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करत खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात टाळ, मुलींनी डोक्यावर तुळस घेत पालखीतून तुकारामांचा जयघोष करत गावातून विठ्ठल मंदिरात पालखी नेली, याव्लेई गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते तर मंदिरासमोर पालखी दाखल होताच ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत व पूजन करत महिलांनी चक्क फिगडी व रिंगण खेळण्याचा आनंद लुटला तर या बालचमुंचे सरपंच दिपाली खैरे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षां राजश्री तांबे, उपाध्यक्ष जालिंदर थोरात यांसह आदींनी अभिनंदन केले आहे.
फोटो खालील ओळ – हिवरे कुंभार ता. शिरुर येथील शालेय बालचमूंनी काढलेली वृक्षदिंडी.
