शिरूर
( प्रतिनीधी ) केंदूर ता. शिरुर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील उपक्रमशील कलाशिक्षक संजय जोहरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे यांच्या वतीने छत्रपती राजश्री शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील उपक्रमशील कलाशिक्षक संजय जोहरे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते साठी विविध उपक्रम राबवून वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी घडविण्याचे काम केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे यांच्या वतीने छत्रपती राजश्री शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यशदा व बार्टीचे माजी संचालक रविंद्र चव्हाण व महिला व बालकल्याण विभागाचे उपआयुक्त राहुल मोरे यांच्या हस्ते देण्यात आल्याचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी सांगीतले. सदर याप्रसंगी सुरेश कांचन, राजेंद्र कांचन, संदीप जगताप, प्रशांत बेंगळे, राहुल गायकवाड, सुवर्णा कांचन, समितीचे अध्यक्ष भिमराव धिवार, कार्याध्यक्ष विजय शिंदे, सचिव राजेंद्र शिशुपाल, सहसचिव विजय रोकडे यांसह आदी उपस्थित होते. तर संजय जोहरे यांना मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
फोटो खालील ओळ – केंदूर ता. शिरुर येथील विद्यालयाचे शिक्षक संजय जोहरे यांना पुरस्कार प्रदान करताना पदाधिकारी.