सणसवाडीत अनधिकृतपणे ताबा घेणाऱ्यांवर गुन्हाशिक्रापूर पोलिसांत दोन महिलांसह सहा इसमांवर गुन्हा दाखल

9 Star News
0
सणसवाडीत अनधिकृतपणे ताबा घेणाऱ्यांवर गुन्हा
शिक्रापूर पोलिसांत दोन महिलांसह सहा इसमांवर गुन्हा दाखल 
शिरूर 
(  प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथे एका हॉस्पिटलसाठी भाड्याने दिलेल्या इमारतीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने मूळ मालकांनी सदर इसमाला नोटीस पाठवून इमारतीला टाळे लावलेले असताना काही महिलांसह इसमांनी सदर इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश करुन ताबा घेण्याचा प्रयत्न केला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजेंद्र पुंजाजी पगार, लताबाई बुवाजी शिरसाट, बेगम उस्ताद सय्यद, रामकृष्ण रामचंद्र गिरमकर, प्रवीण रावसाहेब ढवळे यांसह तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                      सणसवाडी ता. शिरुर येथील अश्विनी तांबे यांची इमारत एका डॉक्टरच्या ओळखीने राजेंद्र पगार यांना भाडे तत्वावर देण्यात आलेली होती, सदर इमारतीबाबत भाडे करारनामा केला असता आघाऊ रकमेचे चेक पगार यांनी तांबे यांना दिलेले होते मात्र सदर चेक बँकेत भरल्यानंतर वटले नसल्याने पगार यांनी चेक पार्ट द्या मी रोख रक्कम देतो असे म्हणून चेक प्रत घेत इमारतीमध्ये काम देखील चालू केले मात्र रक्कम देण्यात टाळाटाळ करु लागल्याने तांबे यांनी राजेंद्र पगार यांना नोटीस पाठवत सदर इमारतीला काही दिवसांपूर्वी कुलूप लावले, त्यांनतर २१ जुलै रोजी काही महिला व इसम सदर इमारतीचे कुलूप तोडून आतमध्ये आले दरम्यान तांबे यांनी त्यांना विचारपूर केली असता आम्हाला राजेंद्र पगार यांनी आठवले असल्याचे सांगितले यावेळी तांबे यांनी तातडीने पोलीस मदत घेण्यासाठी पोलीस कंट्रोलरूम ला फोन केला असता काही पोलिसांनी घटनास्थळी जात तेथील महिला व इसमांना ताब्यात घेतले मात्र तीन जन पळून गेले, याबाबत अश्विनी शांतीलाल तांबे वय ४५ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी राजेंद्र पुंजाजी पगार रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे, लताबाई बुवाजी शिरसाट, बेगम उस्ताद सय्यद दोघी रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे, रामकृष्ण रामचंद्र गिरमकर रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे, प्रवीण रावसाहेब ढवळे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांसह तीन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्त्तनवार हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!