शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भिमा परिसरातील पात्र मतदारांसाठी मतदान नोंदणी कार्यक्रम दिनांक 23 जुलै रोजी शिक्रापूर येथे आयोजित केला असले की माहिती जीवन ज्योती बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली आहे.
जीवनज्योत बहुउद्देशीय सामाजिक संस्था शिक्रापूर यांच्या सहकार्याने मतदार नोंदणीचा कॅम्प पूणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशेजारी 23 जुलै सकाळी 11 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
याबाबत जीवन ज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नव मतदार नोंदणी साठी शिबिर आयोजित करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या पत्राची दाखल घेऊन हे नव मतदार नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले आहे.
रांजणगाव गणपती, २. तळेगाव ढमढेरे, ३. कोरेगाव भिमा या कार्यक्षेत्रातील पात्र मतदारांच्या नावाची नोंदणी करणेसाठीनव पात्र मतदारांनी या शिबिरासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शिरूर त तहसीलदार तथा शिरूर विधानसभेचे सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी या पत्राची दखल घेऊन त्वरित नव मतदार नोंदणी शिवरायांच आयोजन केले आहे . त्याबद्दल त्यांचेही आभार पाटील यांनी मानले.
मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१. रहिवाशी पुरावा :- रेशनकार्ड/ वीज देयक / वाहन परवाना / पासपोर्ट यापैकी एक १
२. ओळखपत्र पुरावा : आधार करर्ड / पॅनकार्ड / वाहन परवाना/ बैंक खाते पुस्तक यापैकी एक
३. जन्म तारखेचा पुरावा आधार कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला.