शिरूर शहर परिसरामध्ये डेंगू व संसर्गजन्य रोग पसरला असून, याबाबत तालुका आरोग्य प्रशासन व शिरूर नगरपरिषद ने सतर्क राहण्याची गरज असून, दोन्ही खात्याचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
शिरूर शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्यू व संसर्ग रोगाची लागण झालेल्या अनेक रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अनेकांना व्हायरल इन्फेक्शन व काहींना पेशी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यात काही जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे सांगितले .
काही खासगी हॉस्पिटलमधून अनेक रुग्णवर रुग्णालयांमध्ये उपचार चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
परंतु अद्याप तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा तालुका आरोग्य खात्याने कुठलीही ठोस कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे शहरातील लोकही याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येते तर नगर परिषदेला याबाबत म्हणावी अशी माहिती नसल्याचे त्यांच्या हालचालीवरून दिसून येत आहे.
परंतु सध्या शिरूर शहरांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्यू व संसर्गजन्य रोगाची साथ असून शहरातील अनेक भागांमध्ये यासाठीचे रुग्ण आहेत. परंतु तालुका आरोग्य खाते याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यात नगर परिषदेने त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. शहरांमध्ये डेंग्यूचा रुग्ण खाजगी रुग्णालयामध्ये आढळल्यानंतर याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी यांना याबाबत सांगण्याचे खाजगी हॉस्पिटल यांना बंधनकारक आहे.
परंतु अनेक वेळा खाजगी दवाखाने याबाबत आरोग्य खात्याला ही सांगत नसल्याचे आरोग्य खात्याकडून समजते. त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांना पत्रव्यवहार करून याबाबतची माहिती देणे गरजेचे आहे. याबाबत माहिती न देणारे डॉक्टरांना कारवाई करणे गरजेचे आहे. सध्या शिरूर शहरांमध्ये डेंगू व संसर्गजन्य रोगाची साथ आहे .
याबाबत तालुका आरोग्य खाते व शिरुर नगर परिषद यांनी सतर्क राहणे गरजेचे असून याविषयी उपाययोजना नागरिकांमध्ये जागृती जागृती पत्रके काढून करण्याची गरज आहे .
पावसाळ्याचे दिवस असून गच्चीवर असणारे टायर इतर वस्तू यामध्ये पाणी साचून त्यात डेंगू आळ्या तयार होण्यास वाव मिळत आहे त्यामुळे शहरात नगरपरिषद व तालुका आरोग्य विभाग यांच्या वतीने पहानी करून त्यात जंतुनाशक सोडावे व शहरात जंतुनाशक फवारणी व धुराडा फवारणी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.