राजकीय कार्यकर्ते सुशांत कुटे नवीन सामाजिकभूमिपुत्र प्रतिष्ठान संघटनेची स्थापना
शिरूर प्रतिनीधी
शिरुर मधील सामाजिक राजकीय कार्यकर्ते सुशांत कुटे यांनी आज गुरुपौर्णिमेच्या शुभदिवशी आपल्या भूमिपुत्र प्रतिष्ठान या नवीन सामाजिक संघटनेची घोषणा केली.
ही घोषणा करत असतानाच त्यांनी शिरुर चे दिवंगत नेते आणी जगप्रसिद्ध उद्योजक रसिकलाल धारीवाल यांच्या बहुप्रतीक्षित स्मारकाबाबत शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना पत्र देणार असल्याचे सांगितले
दिवंगत मा नगराध्यक्ष मा रसिकलाल धारीवाल यांचा स्मारकाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा होणे गरजेचे असुन वेळप्रसंगी आंदोलनाचा इशारा कुटे यांनी दिला आहे
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हज़ारों शिरुरकरांच्या एका भावनिक पण महत्त्वाच्या विषयावर आपणाला पत्र लिहित असल्याचे सांगताना
शिरुर नगरी व उद्योजक आदरणीय स्व रसिकलाल धारीवाल हे वेगळ समीकरण अनेक दशके पहायला मिळत आहे
माणिकचंद उद्योगसमूहापासुन व्यावसायिक सुरुवात करणारे देशाच्या उद्योग जगतातील एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणुन आदरणीय रसिकलाल धारीवाल यांची जगभरात ओळख आहे
फक्त उद्योग व्यावसाय नव्हे तर आपल्या दानशुरत्वाने अनेक धार्मिक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात भाऊंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे
धारीवाल म्हणजे शिरुर असे समीकरण वर्षानुवर्ष प्रत्येक शिरुरकर पहात आहेत.आदरणीय भाऊंचे 24 ओक्टोबर 2017 रोजी परिनिर्वाण झाले.हा क्षण उद्योग जगताबोरबरच शिरुरकरांसाठी वेदनादायी होता
भाऊंचे शिरुर नगरीशी एक वेगळे नाते होते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा पुढील अनेक पिढ्यांना परिचय रहावा या साठी शिरुर शहरातील अनेक संघटनांनी त्यांच्या स्मारक होणेबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे
परंतु शिरुर नगरपरिषदेमध्ये प्रशासक असल्याने हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे
आदरणीय भाउंचे सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते
त्यांच्या यथोचित स्मारकाबाबत शासनस्तरावर कसलीही अडचण येणार नाही
तरी आपण आपल्या स्तरावर याबाबत तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी कुटे यांनी केली आहे