शिरूर दिनांक प्रतिनिधी
रांजणगाव सांडस केंद्राच्या दत्तनगर येथील शाळेत येथे शाळा भेटीसाठी गेलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना दोन शिक्षकांनी तू आलास आता बस तुला चहापाणी करतोस तुझा मोठा सत्कार करतो तुला आता इथेच मारून टाकतो असे म्हणून अधिकाऱ्याला मारहाण करत कोंडून ठेवल्याची घटना घडली आहे.
याबाबत गून्हा पोलिसात दाखल न करता त्या शिक्षकांचे निलंबन केले आहे व त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे.
याबाबत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल न करता केवळ शासकीय पातळीवर या शिक्षकांचे निलंबन केल्याने शिरूर तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. कारवाईबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी मात्र शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी गुप्तता का पाळली याबाबात शिक्षकांमध्ये उलटसुलट विद्यार्थ्यांना उदान आले आहे.
याबाबत आजपर्यंत कुठलाही गुन्हा शिरूर पोलीस स्टेशन येथे गट विकास अधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी यांनी का नोंदवला नाही याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
१५ जून २०२४ पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शुक्रवार २८ जून रोजी रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट व तपासणीसाठी विस्तार अधिकारी (शिक्षण) रघुनाथ बजाबा पवार गेले होते. त्यांनी शाळेत प्रवेश करताच महेश काळे व कैलास पाचर्णे या शिक्षकांनी त्यांना दमदाटी आणी अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ सुरू केली.पवार यांनी शिक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला असता’ चल तू आलाय ना, मग मुख्याध्यापकांच्या कक्षात बसू, तुला चहापाणी करतो, सत्कार करतो असे म्हणत या शिक्षकांनी त्यांना बळजबरीने मुख्याध्यापकांच्या कक्षात नेले, कक्षाचा दरवाजा लावून घेत खुर्चीत पायावर पाय ठेवून बसण्यास धमकावले. त्यामुळे भेदरलेल्या पवार यांनी मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करताच शिक्षक आणखीच चिडले, मोबाईल हिसकावून घेत टेबलवर जोरात आपटला. त्यातूनही शांत न झालेल्या या शिक्षकांनी पवार यांना मारहाण,शिवीगाळ केली. निघ इथून नाहीतर इथेच मारून टाकतो,’ अशी धमकी देत हाकलून दिले.
शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी (ता. २८) हा प्रकार घडला असून विस्तार अधिकारी (शिक्षण) रघुनाथ बजाबा पवार यांनी दिलेल्या लेखी अहवालावरून तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या संभाषण व चित्रफितीच्या आधारे काळे व पाचर्णे या शिक्षकांवर गटविकास अधिकारी महेश डोके यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आह
शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ पवार हे प्रथमच दत्तनगर येथे शाळा भेटीसाठी गेले होते. त्यांची पार्श्वभूमी त्रास देण्याची नाही. तरीही हा प्रकार घडल्याने त्याची गंभीर दखल घेतली आहे. पवार यांनी लेखी अहवालासोबत मोबाईलमधील संभाषण व चित्रफीत सादर केली असून, चित्रफितीचे अवलोकन करता या शिक्षकांची त्यांच्यासोबतची वागणूक कशी, असेल याचा स्पष्ट अंदाज येतो, त्यांना मारहाण ही झाली आहे.
संबंधित शिक्षकांची व्हिडिओतील वाक्ये देखील आक्षेपार्ह असल्याने संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली.
महेश डोके -गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरूर