सावधान! रामलिंग रस्त्यावरील शाळा परिसर व महाजनमळा बोऱ्हाडेमळा परिसरात फिरतोय बिबट्या.

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
        शिरूर शहराजवळील रामलिंग रस्त्यावरील शाळा परिसरात महाजन मळा बोऱ्हाडे मळा या भागामध्ये दिवसा रात्री फिरतोय बिबट्या तर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरे लावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 
       तर खुलेआम फिरणाऱ्या या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
          शिरूर जवळील महाजन मळा रामलिंग रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून एक बिबट्या दिवसा व रात्री खुल्या फिरताना अनेक नागरिकांनी पाहिले आहे. तर अनेकांना त्याचे फोटो व्हिडिओ काढले आहेत. त्यामुळे या भागात बिबट्या आहे हे आता नक्की झाले आहे. 
          या भागामध्ये पोद्दार शाळा, बालाजी शाळा, सेंट जोसेफ शाळा, या प्रमुख तीन शाळा व रोज हजारो विद्यार्थी या शाळेमध्ये मोटर सायकलवर पालक सोडवायला जात असतात. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात लोक वस्ती वाढलेली आहे. तर महाजन मळा रामलिंग कडे जाणारा हा रस्ता असून रात्री पहाटे दिवसा अनेक कंपनी कामगार, स्थानिक नागरिक, शेतकरी वर्ग यांची येजा असते. त्यामुळे या खुल्या फिरणाऱ्या बिबट्यामुळे अजून पर्यंत तरी कुठल्याही नागरिकांना त्रास झालेला नाही. परंतु मोकाट फिरणारे कुत्री किंवा पशुधन यांच्यावर त्यांनी ताव मारला असावा त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तो या भागात आपले थांडमांडून आहे. 
         महाजन मळ्यात उसाचे क्षेत्र असल्याने तसेच पुढे बोराडे मळा बाबूराव नगर ही आता दाटवस्तीची ठिकाणे या महाजन माळ्यापासून जवळच आहे तसेच पाषाण मळा हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे अचानक या बिबट्याने या लोकवस्तीकडे आपला मोर्चा वळवल तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.
         या मोकाट फिरणाऱ्या बिबट्याला वन विभागाने त्वरित जेरबंद करावी अन्यथा शेतकरी शाळकरी मुले, स्थानिक नागरिक, कंपनी कामगार यांना त्रास किंवा जीविताला मुकाव लागणार आहे. याची गंभीरता घेऊन या भागात त्वरित बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
         महाजन माळा परिसरात वन विभागाच्या वतीने पाहणी केली असून बिबट्याचे ठसे मिळाले असून या भागात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये बिबट्या बाबत जनजागृती केली आहे लवकरच या भागात पिंजरे बसवणार आहे. 
एस एस भुतेकर, वनपाल शिरूर
        शिरूर रामलिंग भागातील दसगुडे मळा , बोऱ्हाडे मळा, महाजन मळा रामलिंग परिसर या भागात बिबट्याचा वावर असून अनेक नागरिकांनी दिवसा व रात्री बिबट्या पाहिला आहे त्याचे व्हिडिओ व फोटो लोकांनी सोशल मीडियावर टाकून जनजागृती केली आहे. लवकरच या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा. 
बाबाची वरपे उपसरपंच रामलिंग ग्रामपंचायत शिरूर
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!