मुंबईत अंडरवर्ल्ड संबंधित असलेल्या ड्रग्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पडदा फास , 327 करोडचा अमली पदार्थ जप्त

9 Star News
0

शिरूर (विशेष प्रतिनिधी)मुबईत अंडरवर्ल्ड संबंधित असलेल्या ड्रग्स रॅकेटचा गुन्हेशाखा मार्फत पडदा फास , 327 करोडचा अमली पदार्थ जप्त केला असून पंधरा जणांना ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तीन पिस्तूल, एक रिवाल्वर आणि ३३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. याचा मुख्य सूत्रधार आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा मोरक्या सलीम डोळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

      यावेळी १५ मे रोजी शोएब मेमन व निकोलस हे दोन व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरा भाईंदर मध्ये येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविराज कुराडे यांना मिळाली होती. त्यावरून पोलीसांनी घोडबंदर येथील चेना भागात सापळा रचून आरोपीना ताब्यात घेतले. यात आरोपीकडून दोन कोटी किंमतीचे जवळपास एक किलो एमडी ड्रग्स पोलिसांना मिळाले होते. सदर आरोपींची पोलीस चौकशी केली असता आरोपीना तेलंगणा येथून हे अमली पदार्थ आल्याचे माहिती समोर आली .त्यामुळे हा अमली पदार्थ साठा तयार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक तेलंगणा येथील विकाराबाद जिल्ह्यात गेले. यातून नासिर उर्फ बाबा शेख आणि दयानंद उर्फ दया माणिक या आरोपीना अटक करून २५ कोटी किंमतीचे एम. डी आणि कारखाना पोलिसांनी जप्त केला होता.

यावेळी अधिक तपास केला असता अमली पदार्थाची मोठी टोळी सक्रिय असलेले पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून वाराणसी, महाराष्ट्र , आणि गुजरात येथे शोध मोहीम राबवून अन्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात पैशाची देवाण-घेणाव व इतर गोष्टीमध्ये मुख्य सूत्रधार आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा मोरक्या सलीम डोळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.तर चौकशीअंती पोलिससांनी एकूण १५ आरोपीना अटक करून एकूण ३२७ किंमतीचे एम. डी जप्त केले. याशिवाय आरोपीकडून तीन पिस्तूल, एक रिवाल्वर आणि ३३ जिवंत काढत असे देखील हस्तगत करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.

व्यवहाराचे मुख्य केंद्र गुजरात

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा परदाफास्ट करत असताना पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम चा मोरक्या सलीम डोळा हा गुजरातच्या सुरत येथील व्यापारी झूल्फीकार उर्फ मूर्तझा कोठारी मार्फत व्यवहार करत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कोठारीला ताब्यात घेऊन त्याकडून १० लाख रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच ही रक्कम मुंबईच्या मुस्तफा फर्निचर वाला या अंगडिया (हवाला ) मार्फत पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!