गाव हे वेगळे असते त्यामुळे प्रत्येक गाव कसे सुधारले पाहीजे , ग्रामविकासाठी नेमके काय केले पाहीजे याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे असून,प्रत्येक गाव स्वंत : वीजनिर्मिती , गॅसनिर्मिती व सीएनजी निर्मिती करुन उर्जावान होवू शकतात .गावांच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार विकास योजना राबविल्या पाहीजेत . ग्रामविकासाकरीता ग्रामसभेचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय गौरव पुरस्कार विजेते सरपंच संतोष ठिकेकर यांनी केले.
शिरूर तालुक्याचे सालकरी स्वर्गिय बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने माजी आमदार बाबूराव दौंडकर यांच्या ३७ व्या स्मृतिदिन व कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून ठिकेकर बोलत होते .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी होते. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रांत ग्रामविकास संयोजक मधुकर भोसले , राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संभाजीअप्पा गवारी आदी उपस्थित होते .
यावेळी ठिकेकर म्हणाले की प्रत्येक खेडी आत्मनिर्भय होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटी पेक्षा खेडी स्वयंपूर्ण व आत्मनिर्भय केली पाहीजेत. गावाची अर्थव्यवस्था सक्षम करा , आरोग्यसह शिक्षणाच्या सोयी व अन्य सुविधा खेड्यात उपलब्ध झाल्यास खेड्यातून शहराकडे जाणारे लोंढे थांबू शकतात
. आपल्या गावात पिण्याचा पाण्यासाठी आरोह बसविल्यानंतर त्याचा चांगल्या परिणाम गावचे आरोग्य सुधारणेवर झाल्याचे त्यांनी सांगितले .
ग्रामविकासाचे काम करताना सातत्य ठेवा धीर सोडु नका असे ही ते म्हणाले . नैसर्गिक साधनांनी समृध्द असणारा देश आहे .शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष नोटरी धर्मेंद्र खांडरे यांनी केले . स्मारक समितीचा वतीने शिरुर तालुक्यात शेतक-यांसाठी करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.
शेतक-यांच्या सर्वागीण विकासासाठी समिती कार्यरत असल्याचे ते म्हणाले .
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समारक समितीचे सदस्य विठ्ठल वाघ यांनी केले .स्वागत सहसचिव नारायण शिंदे यांनी तर आभार उपाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी मानले .
सामूदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली . स्मारक समितीचे अध्यक्ष नोटरी धर्मेंद्र खांडरे तर उपाध्यक्ष धनंजय गायकवाड , सचिव -अविनाश भेगडे ,सहसचिव नारायण शिंदे , कोषाध्यक्ष सागर फराटे , आहेत तर सदस्य म्हणून तानाजीराव राउत , विठ्ठल वाघ , दत्ताभाउ दरेकर , योगेश दौंडकर आदी आहेत .
फोटो ओळी बाबूराव दौंडकर स्मृति दिन व कृषिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना संतोष ठिकेकर