शिरूर
( प्रतिनिधी ) हिवरे कुंभार ता. शिरुर येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत नयना जालिंदर मांदळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
हिवरे कुंभार ता. शिरुर येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच विश्वनाथ शिर्के यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच दिपाली खैरे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी शैलेजा कुदळे यांच्या देखरेखेखाली निवडणूक घेण्यात आली, यावेळी सरपंच दिपाली खैरे, मावळते उपसरपंच विश्वनाथ शिर्के, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दिपक खैरे, शारदा गायकवाड, अमोल जगताप, सोमनाथ आढगळे, हौसाबाई जगताप, नयना मांदळे, संध्या गायकवाड हे उपस्थित होते, यावेळी नयना मांदळे यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला तर त्यांच्या विरोधात कोणाचाही अर्ज न आल्याने नयना जालिंदर मांदळे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेजा कुदळे यांनी जाहीर केले तर निवडी नंतर उपसरपंच नयना मांदळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे जनक विकास गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तर निवडीनंतर बोलताना गावातील शिल्लक विकास कामांचा आढावा घेऊन ती लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपसरपंच नयना मांदळे यांनी सांगितले यावेळी माजी चेअरमन जालिंदर मांदळे यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – हिवरे कुंभार ता. शिरुर ग्रामपंचायतच्या उपसरपंच निवडीबद्दल उपसरपंच नयना मांदळे यांचा सन्मान करताना पदाधिकारी.