शिरूर हवेली तालुक्यातील बेरोजगार तरुणांना औद्योगिक वसाहतीत रोजगार मिळवून देण्यासाठीच आमदारकीची निवडणूक लढवणार चंदन सोंडेकर
शिरूर प्रतिनिधी
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाकडून शिरूरचे भूमिपुत्र पक्षाचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे नाईन स्टार न्युजशी बोलताना सांगितले..मागील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपले नशीब वंचित बहुजन आघाडी या पक्षा कडून आजमावले होते.
शिरूर तालुक्याचे दिग्गज आमदार अशोक पवार माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्या बरोबर लढत देत असताना त्यांनी तीन नंबरचे मतदान घेतले होते.
वंचित बहुजन आघाडी या पक्षात जात असताना त्यांनी तालुक्याचे आमदार अशोक पवार यांच्यातील मतभेदमुळे व नेहमी डावलण्याची भूमिका अशोक पवार यांनी घेतल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मधून वंचित बहुजन पक्षात प्रवेश केला होता.
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करून ते पुन्हा स्वगृही परतले व शिरूर विधानसभा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली फळी निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.
शिरूर हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाले ,परंतु स्थानिक तरुणांना कुठेही रोजगार मिळाला नाही कोणत्या लोकप्रतिनिधींनी मिळून दिला नाही. निवडून येणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी आपले व आपल्या बगलबच्चां बरोबर ठेकेदारीमध्ये गुंतला होता व आजही गुंतलेला आहे. परंतु शिरूर तालुक्यातील बेरोजगार तरुण आजही रोजगारासारखी वन वन फिरत आहे. अशा बेरोजगार तरुणांना शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत मध्ये कायमचा रोजगार मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हवेली तालुक्यातील गेली अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. या कारखान्याची निवडणूक घेतली परंतु कारखाना अद्याप सुरू झाला नाही हा कारखाना राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुरू करणार.
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना मागील गळीत हंगामात सुरू झाला नाही यामुळे शिरूर तालुक्यातील कामधेनु बंद पडली आणि शेतकरी व ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. लोकप्रतिनिधी मात्र याबाबत ब्रश शब्द काढायला तयार नसून हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवलेले आहे. या कारखान्यावर बँक ऑफ बडोदा यांनी मालमत्ता जप्त केली आहे. ही तालुक्याचे दृष्टीने शरमेची गोष्ट आहे. या कारखान्यावर मालमत्ता जप्तीची वेळ आली व कारखाना बंद पडला येणाऱ्या पुढील काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून घोडगंगा सहकारी साखर कारखाना व यशवंत साखर कारखाना सुरूच करणार असल्याचेही चंदन सोडेकर यांनी सांगितले .