शिरूर दिनांक १९
( प्रतिनिधी ) शिरूर तालुक्यातील सर्व शाळा डिजिटल करुन शिरुर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या सर्व प्रकारच्या शाळांचे तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिली आहे.
विठ्ठलवाडी ता. शिरुर येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर या ठिकाणी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्याध्यापक शिक्षक सहविचार सभेमध्ये बोलत होते, याप्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष निवृत्तीअण्णा गवारे, ज्येष्ठ नेते कांतीलाल गवारे, बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे, कृषी लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक, शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, बाळासाहेब चव्हाण, अशोक सरोदे, एकनाथ चव्हाण, रामनाथ इथापे, वसंत रणसिंग, राजाराम ढवळे, प्रविणकुमार जगताप, सुभाष देशमुख, प्रा. संदीप गवारे, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गवारे यांसह आदी पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. दरम्यान शिक्षण विभागाशी संबंधित संस्थांचे, शाळांचे, शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, मुख्याध्यापकांचे अनेक प्रलंबित प्रश्न असून मुख्याध्यापक मान्यतेसाठी जाचक नवे नियम, जुनी पेन्शन, योजना टप्पा, अनुदान वेतनेतर अनुदान अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, वैयक्तिक संच मान्यता, शालार्थ आयडी इत्यादी अनेक अडचणी व प्रश्न शिक्षकांनी मांडले. तर यावेळी बोलताना चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असे सांगत गुणवत्ते सोबत अनेक उपक्रमांचे माहेरघर असलेले श्री पांडुरंग विद्यामंदिर हे खऱ्या अर्थाने संस्काराचे ज्ञान मंदिर असल्याचे देखील पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी म्हटले, यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – विठ्ठलवाडी ता. शिरुर येथे शिक्षकांशी संवाद साधताना पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर.
