प्रत्येकाला सामाजिक जाणीव गरजेची – उषा वाघ
शिरूर ( प्रतिनिधी )
सामाजिक जाणीवेतून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा फायदा गरजू शालेय मुलांना होत असल्याने प्रत्येकाला सामाजिक जाणीव असणे गरजेचे असल्याचे मत समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उषा वाघ यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील समता शिक्षण संस्था संचालित आनंदाश्रम प्राथमिक शाळा येथील दोनशे शालेय विद्यार्थ्यांना समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उषा वाघ यांच्या उपस्थितीत निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांच्या संकल्पनेतून वह्या, पेन सह शालेय साहित्य वाटप करण्यात आले, याप्रसंगी, मुख्याध्यापक संदीप गोसावी, अधीक्षक शंकर मुळोनी, अधिक्षिका विजया अहिरे, शशिकला खेडेकर, शंकर शिंदे, निलेश देसने, विजय भोर, ज्येष्ठ पत्रकार संजय देशमुख, प्रवीणकुमार जगताप, नूरमहम्मद मुल्ला, जालिंदर आदक, नागनाथ शिंगाडे, आकाश भोरडे, मयूर भुजबळ, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान शालेय गरजू मुलांना शाळा सुरु होताच वह्या पेन मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला, तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी सदर उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना एक प्रकारे मोठा आधार मिळत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक संदीप गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील आनंदाश्रम प्राथमिक शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप करताना पदाधिकारी.