कारेगावात एकाच इमारतीतून दोन दुचाक्या चोरी
( शिरूर प्रतिनिधी ) कारेगाव ता. शिरुर येथील एकाच इमारतीतून दोन दुचाक्या चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारेगाव ता. शिरुर येथील कोहकडे वस्ती येथे योगेश कोहकडे यांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहणारे रोहित धुळे व प्रवीण चव्हाण हे दोघे रात्रीच्या सुमारास कामाहून आल्यानंतर त्यांची त्यांच्या एम एच १२ के व्ही ५९१५ व एम एच २९ ए वाय ९४७७ या दोन दुचाक्या इमारतीखाली पार्किंग मध्ये लावून ठेवलेल्या होत्या, सकाळच्या सुमारास दोघे पार्किंग मध्ये आले असता त्यांना त्यांच्या दुचाक्या दिसल्या नसल्याने त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता दुचाक्या चोरीला गेल्याचे निदर्शनास आले, याबाबत रोहित अरविंद धुळे वय २४ वर्षे सध्या रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. तरोडा ता. उमरखेड जि. यवतमाळ यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय सरजिने हे करत आहे.