शिरूर
( प्रतिनिधी ) कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गालगत हॉटेल पंजाबी तडका येथे काही इसम अवैध्य पद्धतीने देशी विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली, त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, पोलीस नाईक महेंद्र पाटील, पोलीस शिपाई निखील रावडे, जयराज देवकर यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना दोन इसम नागरिकांना देशी दारुच्या बाटल्या विक्री करताना मिळून आले, यावेळी पोलिसांनी सदर इसमांना ताब्यात घेत त्याच्या जवळील दारुसाठा जप्त केला, याबाबत पोलीस शिपाई जयराज वसंत देवकर वय ३७ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी संजय निर्मल दास वय ४५ वर्षे व रणजीत निर्मल दास दोघे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहे.