शिरूर ( प्रतिनिधी )
आमदाबाद ता. शिरुर येथे जुन्या वादातून एका मच्छिमाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे परसराम वसंत पवार, समाधान वसंत पवार, भानुदास माळी, छकुला भानुदास माळी, आशाबाई दिलीप पवार, सचिन दिलीप पवार, अमीर दिलीप पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदाबाद ता. शिरुर येथील बाळू वाघ या मच्छिमाराची गावातील काही इसमांसोबत वाद झालेले होते, त्यांनतर ४ जुलै रोजी बाळू हा गावातून घरी येत असताना घारेमळा येथे गावातील परसराम पवार सह आदींनी बाळूला अडवून जुन्या वादातून शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी गज, लाकडी काठीने बेदम मारहाण करत जखमी केले, याबाबत बाळू मारुती वाघ वय १९ वर्षे रा. आमदाबाद ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी परसराम वसंत पवार, समाधान वसंत पवार, भानुदास माळी, छकुला भानुदास माळी, आशाबाई दिलीप पवार, सचिन दिलीप पवार, अमीर दिलीप पवार सर्व रा. आमदाबाद ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश भगत हे करत आहे.