शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील एका ठिकाणी खड्ड्यामध्ये सात नागाची पिल्ले आढळून आले असून निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या प्राणी मित्रांकडून त्या नागाच्या पिलांना जीवदान देण्यात आले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील साई समर्थ नगर येथे सुजित विरोळे यांच्या कोंबड्यांच्या शेड जवळ एक नागाचे पिल्लू असल्याचे दिसल्याने सर्पमित्र अमोल कुसाळकर व शुभम माने सदर ठिकाणी गेले असता त्यांना नागाची तीन पिल्ले दिसल्याने त्यांनी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, शुभम वाघ यांना बोलावून घेतले, यावेळी सर्पमित्रांनी पाहणी केली असता तब्बल सात नागाची पिल्ले दिसून आली, दरम्यान सर्पमित्रांनी त्या पिल्लांना पकडले तर यावेळी बोलताना सध्या नाग व घोणसच्या पिलांचा जन्म होत असून येथे असलेल्या माती व विटांच्या ढिगाऱ्यालगत एखाद्या नागाने अंडी घातलेली असून त्यातून या पिलांचा जन्म झाल्याचे सर्पमित्रांनी सांगितले तर या नागाच्या पिलांची माहिती शिरुर वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे व नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांना देत सर्व पिलांना निसर्गात मुक्त करण्यात आले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे एकाच ठिकाणी आढळून आलेली सात नागाची पिल्ले.