शिक्रापूरच्या विद्याधाम प्रशालेत शिक्षण सप्ताह सुरु
शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील विद्याधाम प्रशाला येथे महाराष्ट्र शासनाच्या परीपत्रका नुसार २२ जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी दिली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील विद्याधाम प्रशाला येथे आयोजित सप्ताहात गणित व विज्ञान विषयक भित्तीपत्रके, फलक लावत पाणी बचत बाबत जनजागृती फलक लावून त्या फलकांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करुन प्रशालेतील वाचन क्लबचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश शेंडे, प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य सुरेश गंगावणे, पर्यवेक्षक पोपटराव मेरगळ, राजाराम गायकवाड, प्रा. नानासाहेब गावडे, प्रा. रोहिणी नरके यांसह आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान शिक्षण सप्ताह मध्ये होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी देत प्राचार्य सोनबापू गद्रे यांनी मा. प्राचार्य गद्रे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नानासाहेब गावडे यांनी केले तर प्रा. रोहिणी नरके यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ - शिक्रापूर ता. शिरुर येथील विद्याधाम प्रशालेत शिक्षण सप्ताहाची सुरुवात करताना मान्यवर.