शिरूर ( प्रतिनिधी )
शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गाहून रस्त्याने पायी चाललेल्या दोघा पादचाऱ्यांना धडकून रस्त्यावर पडल्याने जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्याच्या मागे बसणारा जखमी झाला आहे.
स्वप्नील बाबाजी बोऱ्हाडे ( रा. वरुडे ता. शिरुर जि. पुणे) याचा मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला संतोष श्रीमंत लांडे (रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) हा जखमी झाला .
याबाबत उत्तम गोरक्ष बोऱ्हाडे (वय ४२ वर्षे रा. वरुडे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे शिक्रापूर ता. शिरुर येथील बजरंग वाडी येथे एका मित्राला सोडण्यासाठी स्वप्नील बोऱ्हाडे हा त्याच्या ताब्यातील एम एच १२ सि यु ४२०० या दुचाकीहून आलेला होता, त्यांनतर स्वप्नील हा त्याचा मित्र संतोष लांडे याला सोडण्यासाठी सणसवाडी येथे चाललेला असताना ट्रिनीटी कंपनी समोरून रस्त्याचे पायी चाललेल्या दोघा इसमांना स्वप्नीलच्या दुचाकीची धडक बसून स्वप्नील रस्तावर पडून गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी स्वप्नील बोऱ्हाडे याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला संतोष लांडे हा जखमी झाला असून, याबाबत उत्तम गोरक्ष बोऱ्हाडे वय ४२ वर्षे रा. वरुडे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.