रांजणगावात खंडणी व चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हे जमीन मालकाला मागितली चक्क एक कोटीची खंडणी

9 Star News
0
रांजणगावात खंडणी व चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हे
जमीन मालकाला मागितली चक्क एक कोटीची खंडणी
शिरूर,( प्रतिनिधी ) 
       रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील एका इसमाच्या जमिनीमध्ये बेकायदेशीपणे अतिक्रमण करुन मालकी असल्याचे फलक लावून जमिनीतील मुरूम जेसीबीच्या सहाय्याने चोरी करुन जमीन मालकाला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोघाजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
         पोलिसांनी गंगेश्वर दत्तात्रय सोनवणे व संदीप सुदाम कुटे (दोघे रा. फंडवस्ती रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे) या दोघांवर खंडणी सह अतिक्रमण व चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
           याबाबत गणेश बापू पाचुंदकर (वय ३५ वर्षे रा. पाचुंदकर वस्ती, रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे )यांनी फिर्याद दिली आहे.
               याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे गणेश पाचुंदकर यांच्या मालकीची जमीन असून सदर जमिनीमध्ये गंगेश्वर सोनवणे याने अतिक्रमण करत त्याच्या मालकीची जागा असल्याबाबत फलक लावले त्याबाबत गणेश यांनी विचारणा केली असता शिवीगाळ, दमदाटी केली त्यांनतर २७ जुलै रोजी गंगेश्वर सोनवणे व संदीप कुटे या दोघांनी सदर जमिनीतून जेसीबीच्या सहाय्याने मुरूम काढून मुरुमाची चोरी केली, त्यावेळी गणेश यांनी त्या दोघांना मुरुम चोरीबाबत विचारले असता तुला रहायचे असेल तर आम्हाला एक कोटी रुपये दे अन्यथा पंचवीस गुंठे जागा दे नाहीतर असा त्रास तुम्हाला होतच राहील अशी धमकी देत दोघांनी गणेश यांना शिवीगाळ, दमदाटी केली, याबाबत फिर्यादीवरून गंगेश्वर सोनवणे, संदीप कुटे या दोघांवर खंडणी सह अतिक्रमण व चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!