शिरूर
( प्रतिनिधी ) वढू बुद्रुक ता. शिरुर येथील माहेर संस्थेत शेकडी अनाथ मुलांना आश्रय दिले जात असून येथून शिक्षण घेऊन मोठे झाल्यानंतर प्रत्येकजण विवाहबद्ध होऊन आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना अशाच माहेर मधून मोठे होऊन विवाहबद्ध होणाऱ्या तिघा युवकांनी आपले ऋणानुबंध जपले आहे.
वढू बुद्रुक ता. शिरुर येथील माहेर संस्थेत आश्रय घेणारे विक्रम भुजबळ, नंदकिशोर भोर व सलमान शेख हे तिघे येथील बालकांमध्ये लहानाचे मोठे झाले त्यांनतर नुकतेच नातेवाईकांच्या माध्यमातून ते तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी विवाहबद्ध झाले मात्र यावेळी आपल्या सोबत लहानाचे मोठे होत असलेली माहेर मधील बालके विवाहाला नसल्याची खंत या तिघांच्या मनात असताना नुकतेच माहेर संस्थेच्या संस्थापिका असलेल्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लुसि कुरियन प्रदेशातून येत असल्याची माहिती मिळताच या तिघा नवविवाहित दाम्पत्यांनी माहेर संस्थे मध्ये येत लुसि कुरियन यांच्या उपस्थितीत पुन्हा एकमेकांना हार घालत बालकांना विवाहाचा आनंद दिला, यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका असलेल्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लुसि कुरियन, मिनी चेची, सुशील पोहेकर, प्रसेनजित गायकवाड, विनायक गाडे, विशाल सैदाणे, मीना भागवत, नेहा पोहेकर, हेमलता सैदाणे, अमोल त्रिभुवन, मीना दीदी, सागर वावरे, योगेश भोर, सागर लोणकर, वर्षा लोणकर यांसह आदी उपस्थित होते, यावेळी तिघा नवविवाहितांनी माहेर मधील सर्व बालकांना जेवणाची मेजवानी देत आपल्या सवंगड्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला तर आपल्या तिघा बालकांना जोडीने पाहत लुसि कुरियन यांनी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे यांनी केले तर प्रसेनजीत गायकवाड यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ – वढू बुद्रुक ता. शिरुर येथील माहेर संस्थेतील तिघा विवाहित युवकांना आशिर्वाद देताना लुसि कुरियन.