केंदूरचा सराईत बबलू पऱ्हाड एका वर्षासाठी स्थानबद्ध शिक्रापूर पोलिसांनी केला होता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर

9 Star News
0
केंदूरचा सराईत बबलू पऱ्हाड एका वर्षासाठी स्थानबद्ध
शिक्रापूर पोलिसांनी केला होता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर
शिरूर 
( प्रतिनिधी ) केंदूर ता. शिरूर येथील नेहमी वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा बबलू उर्फ अभिजित चक्रधर पऱ्हाड याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावानंतर अखेर त्याला एक वर्षासाठी एम. पि. डी. ए कायद्याअंतर्ग स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली आहे.
                   केंदूर ता. शिरूर येथील बबलू उर्फ अभिजित चक्रधर पऱ्हाड हा वारंवार खून, जीवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे, पिस्तुल बाळगणे यांसह आदी स्वरूपाचे गुन्हे वारंवार करत होता, तसेच पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अशा गुन्हेगारांवर एम. पि. डी. ए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले असता पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, महेश बनकर, रामदास बाबर, विकास पाटील, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, प्रतिक जगताप, किशोर शिवणकर, निखील रावडे यांच्या माध्यमातून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या बबलू पऱ्हाड यांच्याविरुद्ध प्रस्ताव सादर करून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे सादर केला असता त्यांनी तो प्रस्ताव पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पाठवला असता नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी बबलू उर्फ अभिजित चक्रधर पऱ्हाड वय २५ वर्षे रा. पऱ्हाडवाडी केंदुर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुध्द एम. पि. डी. ए कायद्याअंतर्गत एक वर्ष स्थानबद्धतेचे आदेश दिले असल्याने बबलू उर्फ अभिजित पऱ्हाड याला ताब्यात घेऊन एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
स्वतंत्र चौकट १ -
अजूनही गुन्हेगारांची यादी तयार – दिपरतन गायकवाड.
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दी मध्ये वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या, नागरिकांना त्रास देणाऱ्या, ठेक्यातून वाद निर्माण करणे, कंपन्यांना त्रास देणे, खडणी मागणे, बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या अनेक गुन्हेगारांची यादी सध्या तयार करण्यात आलेली असून त्यांच्यावर देखील मोक्का, तडीपारी यांसह आदी स्वरूपाच्या कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!