येथील विद्याधाम प्रशाले चे चार विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत तर ५० विद्यार्थी शहरी विभागाच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) व पूर्व माध्यमिक (इ.८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच परीषदेमार्फत जाहीर करण्यात आला. या परीक्षेत येथील विद्याधाम प्रशालेने आपली यशाची परंपरा कायम राखत इ. ५ वी च्या २४ व इ. ८ वी च्या २६ अशा एकूण ५० विद्यार्थ्यांनी शहरी विभागाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर प्रशालेतील इ.५ वी च्या श्रीराज कुरंदळे आणि वेदांत जोरी तर इ.८ वी च्या परिजा मगर व तनिष्का पवार या चार विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य एस. टी. शेळके यांनी दिली.
सर्व गुणवंत विद्यार्थी तसेच मार्गदर्शक अध्यापक यांचा प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे उपप्राचार्य गुरुदत्त पाचर्णे, पर्यवेक्षक मच्छिंद्र बनकर, चंद्रकांत देवीकर, दिगंबर नाईक शिष्यवृत्ती विभाग प्रमुख दीपक गुजर, जयश्री गवंड व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरी विभागातून सर्वाधिक संख्येने विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान याही वर्षी अबाधित
राखत प्रशालेने यशाची परंपरा कायम राखली आहे.
इ.५ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे अस्मित गावडे, विराज शेळके, ज्ञानदीप मस्के, अर्णव भुसारे, शिव पाचर्णे,ओवी वाळुंज,शर्वरी औदुतवार, रुद्रांश गायकवाड, उत्कर्षा पाटील,तनुश्री रासकर, कृष्णा चौधरी, श्रेया गाडेकर, स्वरा भोसले, स्वरा भांड, साहील देवीकर, वेदांत भोईटे, आरव मदगे, वैभवी घावटे, मोहनीश पंदरकर, अमृता सरोदे, सिध्दी माने, पार्थ वाकडे.
इ.८वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे - श्रेयश चव्हाण, नील सोनवणे, प्राची शेळके, सिध्दी गुंड, श्लोक साबळे,भक्ती कोहकडे, तेजल जगदाळे, शंभूराजे पाचर्णे,अथर्व पठारे, शुभम खोडदे,हर्षल यादव,स्नेहा आटोळे, तृप्ती जाधव, सत्यम रसाळ, विराज बोरकर, आर्यन कोकाटे, मानसी दिवेकर, यशश्री मुळे, सुयश कर्डीले, सिध्दी मोहिते, सर्वज्ञ कडेकर, गायत्री लगड, स्नेहा झरेकर, सुमित भळगट.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील अध्यापक यमुना रायकर, गोपाल कुल, सोनाली सोनवणे, दीपाली पडवळ, ललिता भुजबळ, हर्षदा कौठकर,रोहिनी सालके, सागर पारधे, संदीप बनकर, रेखा विधाटे, मंगल भालेकर, प्राची कुलकर्णी, निता वाघमारे, विवेकानंद क्षीरसागर, सविता दिवेकर, अश्विनी गायकवाड, पवार मॅडम, तांबे मॅडम, यादव मॅडम, ढोले मॅडम आदींनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापकांचे संस्थेचे शिरूर प्रसारक मंडळाची अध्यक्ष अनिल बोरा, सचिव प्राचार्य नंदकुमार निकम , शालेय समिती अध्यक्ष धरमचंद फुलफगर आणि सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.