यूपीएससी हेच ध्येय होते परंतु यशाचा पाठलागकरतांना हुलकावणी मिळत होती. पहिल्या प्रयत्नात प्रारंभिक परीक्षा पास झाली परंतू मुख्य परीक्षेत अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नामध्ये प्रारंभिक परीक्षेत देखील अपयश आले. तिसऱ्या प्रयत्नामध्ये प्रारंभिक परीक्षा पास झाली तसेच मुख्य परीक्षेत ही यश आले परंतु मुलाखतीमध्ये कमी पडलो. असे अनेक वेळा घडले. ४ वेळा यूपीएससीची मुलाखत दिली, राज्यसेवेची पण २ वेळा मुलाखत दिली परंतु यश हुलकावणीच देत होते. पण नाउमेद झालो नाही की खचून गेलो नाही. अखेर या वर्षी जिद्दीने अभ्यास करुन यशाचा पाठलाग केला आणि त्यावर स्वार झालो.
यूपीएससी परीक्षेतून भारतीय वन सेवेत ९३ व्या क्रमांकाने निवड झालेल्या निमोणेच्या हर्षद हिंर्गेची ही यशोगाथा एमपीयूसी आणि युपीएससी परीक्षेत सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना आदर्श ठरावी अशीच आहे.
हर्षद यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण निमोणे जवळच्या भोसवाडी नावाच्या छोट्याशा वाडीमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. तर पाचवी ते आठवीपर्यंतचे शिक्षण निमोणे गावातील श्री नागेश्वर विद्यालयात झाले. आठवी नंतर ते मामाकडे श्रीगोंदा येथे शिक्षणासाठी गेले. आठवी ते दहावीचे शिक्षण श्रीगोंदा येथील महादजी विद्यालयामध्ये झाले. २००८ साली इयत्ता दहावीला त्यांना ९१.३८% मार्क्स मिळाले ते दहावी मध्ये श्रीगोंदा तालुक्यात पहिले आले व अहमदनगर जिल्ह्यात तिसरे आले. पुढे त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटिकल कॉलेज पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग
सुखदुःख कशातच त्याला सहभागी होता आले नाही.
मध्ये डिप्लोमा केला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर पुढे सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे बीईला ऍडमिशन घेतले व मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बीई पूर्ण केले. पुढे त्यांनी हिस्टरी हा विषय घेऊन यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनंतर २०१५ पासून यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. युपीएससीचा अभ्यास करता करताच त्यांनी एन्व्हायरमेंटल सायन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले.
प्रत्येक मुलाखतीच्या खूप सकारात्मकता आणि आत्मविश्वास होता शेवटी त्याचे रुपांतर यशामध्ये झाले. २०२३ मध्ये यूपीएससीची प्रारंभिक परीक्षा पास झाली त्यानंतर मुख्य परीक्षेत यश मिळाले. मुलाखती मध्ये ही यश मिळाले आणि यूपीएससी कडून त्यांची ९३ व्या क्रमांकाने निवड झाली. हर्षदच्या यशानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण निमोने गावाने जल्लोष केला. हर्षला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले. त्याग केल्याशिवाय आपण मोठ्या गोष्टींचे ध्येय गाठू शकत नाही त्यामुळे यशाचा पाठलाग करताना सणवार, उत्सव, नातेवाईकांचे
हर्षदच्या यशामध्ये त्याच्या आई-वडिलांचा, चुलते किंचक हिंगे, चुलती रंजनाताई व चुलत बंधू रविंद्र ह्यांचा खूप मोठा वाटा आहे. आपला हर्षद नक्कीच यूपीएससी पास होणार हा आत्मविश्वास त्यांना होता, ज्या ज्या वेळी हर्षद यांना अपयश आले त्या त्या वेळी हर्षद यांचे आई- वडील व सर्व कुटुंबीय हर्षद यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी हर्षद यांना नैतिक पाठींबा दिला आधार दिला. आर्थिक पाठबळ दिले. हर्षद ह्यांना ज्या ज्यावेळी पैशाची अडचण भासली त्यावेळी त्यांचे चुलत बंधू रवींद्र यांनी वेळोवेळी त्यांना मदत केली. हर्षद यांना कुठलीही अडचण भासू दिली नाही. ज्यावेळी विद्यार्थी यूपीएससी सारख्या परीक्षेची तयारी करत असतात त्यावेळी जरी थोडे अपयश आले तरी अशा अशावेळी विद्यार्थ्यांना कुटुंबियांनी आधार देणे खूप आवश्यक असते आणि हाच आधार हर्षद यांना वेळोवेळी त्यांच्या घरच्यांकडून मिळाला. माझ्या यशामध्ये निमोणे गावातील ग्रामस्थ तसेच मित्रांचाही मोठा सहभाग आहे, असेही हर्षद यांनी आवर्जून नमूद केले.
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश !
यूपीएससीची परीक्षा पास होणारच ही माझी प्रबळ इच्छा होती. या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी अभ्यासामध्ये सातत्य ठेवले. प्रचंड मेहनत घेतली. अपयश आले तरी संयम ठेवला. आज देखील मी पहाटे चार साडेचारला उठून दररोज कमीत कमी तीन तास अभ्यास करतो. अभ्यासासाठी पहाटेची वेळी अत्यंत उत्तम वेळ असते. संयम आणि चिकाटी बरोबरच आत्मविश्वास खूप महत्वाचा आत्मविश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो. आयुष्यात शॉर्टकट नसतो. जर तुम्हाला खरोखरच काही करावयाचे असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाही.
हर्षद हिंगे निमोणे, ता. शिरूर