शिरूर दिनांक प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटामध्ये शिरूर मध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून या सर्व महिलांचा सत्कार शिरूर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी करून महिला पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. 
यामुळे शिरूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा बोलबाला सुरू असल्याचे दिसून आले या सर्व महिलांनी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाला साथ दिली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा आभार मेळावा शिरूर येथे संपन्न झाला यावेळी पक्षप्रवेश व पद वाटप करण्यात आले.
उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर हवेली चे आमदार ॲड.अशोकबापु पवार , जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार , स्मिता कवाद, राणी कर्डिले,यांच्या प्रमुख उपस्थितत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात महिलांना पद देऊन सन्मानित करण्यात आले.
नगरसेविका रोहिणी बनकर
जिल्हा उपाध्यक्ष.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला.
नगरसेविका ज्योती लोखंडे
जिल्हा उपाध्यक्ष.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला
माजी नगरसेविका शैला साळवे
उपाध्यक्षा शिरूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार.
ललिता पोळ
उपाध्यक्षा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार
उज्वला सुपेकर - महिला शिरूर शहर उपाध्यक्षा ,
प्रतिभा लुंकड - वरिष्ठ महिला सरचिटणीस,
प्रियंका धोत्रे - युवती जिल्हा उपाध्यक्ष,
भाग्यश्री लिंगे - युवती शहर उपाध्यक्ष,
रोहिणी जाधव - युवती शहर सचिव,
प्रतीक्षा मोरटळे - युवती कार्याध्यक्षा
या महिलांना पद देऊन,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महिलांनी खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला.
शशिकला काळे, (आदिशक्ती महिला मंडळ ग्रुप),
सविता बोरुडे, (आधार छाया फौंडेशन ग्रुप)
राजश्री शेजवळ,कल्पना चांदगुडे,मनीषा टेभेकर,दुर्गा ननवरे,प्रीती बनसोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षात पक्षाची शाल देऊन जाहीर प्रवेश करण्यात आला.